अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मुळे चांगलेच चर्चेत आहेत. सध्या दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. नुकतच रणवीर आणि आलियाने मनीष मल्होत्राच्या रॅम्प वॉक शोमध्ये हजेरी लावली होती. या रॅम्प वॉक रणवीरने केलेल्या कृतीने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा- आलिया आणि रणबीरची मुलगी राहा मोठी होऊन काय बनणार? अभिनेत्रीने केलं स्पष्ट म्हणाली, “तिला मी…”

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओदरम्यान अभिनेता रणवीर सिंग रॅम्प वॉक करताना दिसत आहे. त्याने पांढऱ्या आणि हलक्या तपकिरी रंगाची शेरवानी घातली आहे. या रॅम्प वॉक शोमध्ये दीपिका पादूकोण आणि त्याच्या आईनेही हजेरी लावली होती. रॅम्प वॉक करताना रणवीर अचानक दीपिकाकडे जातो आणि तिच्या गालावर किस करतो. त्यानंतर तो त्याच्या आईच्या पाया पडतानाही दिसत आहे.

रणवीरची ही कृती चाहत्यांना खूपच आवडली आहे. चाहते रणबीरचे कौतुक करत आहेत. या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले “हा मुलगा आपल्या पत्नीला खास वाटण्याची एकही संधी सोडत नाही.” दुसऱ्या युजरने लिहिलं “मी रणवीर सिंगचे खरोखर कौतुक करतो तो सकारात्मक आहे.”

हेही वाचा- Video : “दीपिकाची कॉपी, ढासळलेला आत्मविश्वास…”, आलिया भट्टचा ‘तो’ रॅम्प वॉक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून करण जोहर सात वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्टची जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे. याआधी या जोडीने ‘गली बॉय’मध्ये धुमाकूळ घातला आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ रोमँटिक ड्रामा आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. ‘रॉकी हा चित्रपट २८ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.