बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ६ जुलैला अभिनेत्याने आपला ३८ वा वाढदिवस साजरा केला. यादिवशी रणवीर सिंहवर बॉलीवूडमधील त्याच्या मित्र-मैत्रिणींसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, पत्नी दीपिका पदुकोणने त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा न दिल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

हेही वाचा : “तिच्यासाठी मुलं तासन् तास…”, अभिनेत्री विद्या बालनने सांगितला मलायका अरोराच्या कॉलेजच्या दिवसांमधील किस्सा

वाढदिवस झाल्यावर ४ दिवसांनी रणवीरने पत्नी दीपिकाबरोबर खास फोटो शेअर करत सर्व चाहत्यांचे आणि मित्र-मंडळींचे आभार मानले आहेत. या फोटोमध्ये रणवीर-दीपिका क्रूझवर सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये क्रूझच्या एका खिडकीतून दोघेही बाहेर डोकावताना दिसत आहेत. या कॅप्शनमध्ये रणवीरने लिहिले आहे की, “तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या, तुमचे खूप खूप आभार…”

हेही वाचा : ‘जवान’च्या ट्रेलरमधील ‘तो’ सीन पाहून नेटकऱ्यांना आठवला प्रभासचा ‘बाहुबली’; नेमकं कनेक्शन काय?, पाहा व्हायरल फोटो

रणवीरने दीपिकाबरोबरचा हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. क्रूझवर सुट्ट्यांचा आनंद घेऊन दोघेही आता मुंबईत परतले आहेत. पापाराझींनी रणवीर-दीपिका मुंबईत आलेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये रणवीर गाडीत दीपिकाशी काहीतरी संवाद साधताना दिसत आहे.

हेही वाचा : Jawan Prevue: “मैं पुण्य हूँ या पाप?”, शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’चा ट्रेलर रिलीज; दीपिका, नयनतारासह झळकणार ‘हे’ कलाकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण

दीपिकाने रणवीरच्या वाढदिवशी कोणतीही पोस्ट शेअर न केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले होते. मात्र, अभिनेत्याने शेअर केलेला फोटो पाहून दोघांच्याही चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. लवकरच रणवीर सिंह आलिया भट्टबरोबर २८ जुलैला रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसेल.