शाहरुख खानने नुकताच आपला ५८ वा वाढदिवस साजरा केला. किंग खानच्या वाढदिवसाला अनेक बॉलीवूड कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या पार्टीमधील काही Unseen फोटो व व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरुखच्या वाढदिवसाच्या पार्टीत रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण ही बॉलीवूडची लोकप्रिय जोडीदेखील सहभागी झाली होती. या पार्टीतील रणवीरच्या एका खास व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : पंकज त्रिपाठींनी ‘अटल’ चित्रपटाचे करताना दोन महिने खाल्ला फक्त ‘हा’ पदार्थ; म्हणाले, “मेंदू आणि शरीर यांच्यात…”

शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. या पार्टीत रणवीर सिंह प्रसिद्ध रॅपर मिका सिंहबरोबर डिजे वाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांनीही मिळून किंग खानच्या अनेक लोकप्रिय गाण्यांवर डान्स केला.

हेही वाचा : ‘झिम्मा २’ चित्रपटात शिवानी सुर्वे आणि सुचित्रा बांदेकर यांच्यात असणार खास कनेक्शन, पोस्ट चर्चेत

रणवीर सिंह आणि मिका सिंहने मिळून शाहरुखच्या पार्टीत त्याची झिंदा बंदा, चलैया, जवान, लुंगी डान्स अशी प्रसिद्धा गाणी वाजवली. अभिनेत्याने सगळ्यात शेवटी शाहरुखच्या ‘कभी हा कभी ना’ चित्रपटातील “आना मेरे प्यार को…” हे गाणं लावलं. हे गाणं रणवीरने भर पार्टीत दीपिका पदुकोणला समर्पित केलं. दोघेही एकत्र या गाण्याचा आनंद घेत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. रणवीरच्या कृतीने दीपिका चांगलीची इम्प्रेस झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकऱ्यांनी रणवीर सिंहच्या या व्हायरल व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “रणवीर कायम शाहरुख खानचा आदर करतो”, “शाहरुख आणि रणवीर सिंहला खूप खूप प्रेम”, “रणवीर शाहरुखचा खूप मोठा फॅन आहे” अशा कमेंट्स या व्हिडीओवर करण्यात आल्या आहेत.