रॅपर बादशाह हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. अनेक सुपरहिट गाणी बादशाहने बॉलिवूडला दिली आहेत. पार्टीपासून ते अगदी लग्नापर्यंतच्या कार्यक्रमांत बादशाहच्या गाण्यावर तरुणाई ठेका धरताना दिसते. सध्या बादशाह त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. बादशाह दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा होत्या.

गर्लफ्रेंड ईशा रिखीबरोबर विवाहबंधनात अडकणार असल्याचं वृत्त होतं. यावर बादशाहने प्रतिक्रिया दिली आहे. पुन्हा लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्यानंतर बादशाहने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने संताप व्यक्त केला आहे. “प्रिय मीडिया, मी तुमचा आदर करतो, पण हे चुकीचं आहे. मी लग्न करत नाहीये. ज्याने कोणी हे वृत्त तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे, त्याला चांगला मसाला शोधण्याची गरज आहे, ” असं बादशाहने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> अमिताभ बच्चन यांच्या नातीबरोबर रेखा यांनी दिल्या फोटोसाठी पोझ; अभिनेत्रीचे आराध्याबरोबरचे फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले…

badshah marriage news

हेही वाचा>> Video: कार्यक्रमादरम्यान गरोदर सुनेची काळजी घेताना दिसले मुकेश अंबानी; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…

दरम्यान, बादशाह अभिनेत्री ईशा रिखीला अनेक दिवसांपासून डेट करत आहे. परंतु, याबाबत त्याने कोणतीही ऑफिशिअल माहिती दिलेली नाही. तसेच, ईशा रिखीला डेट करत असल्याच्या अफवांचं त्याने खंडनही केलेलं नाही.

हेही वाचा>> Video: आधी हाय हिल्स काढले अन् मग अनवाणी पायांनीच ‘नाटू नाटू’वर थिरकली आलिया भट्ट, अभिनेत्रीचा रश्मिका मंदानाबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

बादशाहने २०१२ साली जस्मिन मसिहशी लग्न केलं होतं. २०१७ साली त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. बादशाह व जस्मिनला जेसामी ही मुलगीही आहे. लग्नाच्या आठ वर्षांनी बादशाह व जस्मिन घटस्फोट घेत वेगळे झाले होते. मात्र अद्याप त्यांचं वेगळं होण्यामागचं कारण समोर आलेलं नाही