गायक आणि रॅपर हनी सिंग त्याच्या नवीन म्युझिक अल्बम ३.० मुळे चर्चेत आहे. सध्या तो त्याच्या अल्बमचे जोरदार प्रमोशन करत आहे. गेले काही वर्षे हनी सिंग बॉलिवूडमधून पूर्णपणे गायब होता. हनी सिंगने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या डिप्रेशनबद्दल भाष्य केलं आहे. एवढंच नाही तर रॅपरने अक्षय कुमारबाबतही मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा- गोविंदा व आमिर खानच्या ‘या’ चित्रपटातून तब्बूला दाखवलेला बाहेरचा रस्ता; अभिनेत्री म्हणाली, “हे सगळ्या…”

हनी सिंह म्हणाला की, मी ज्यावेळी डिप्रेशनमध्ये होतो, त्यावेळी मला फोनवर कोणालाही बोलू वाटत नव्हते. मी सात वर्ष फोनच वापरणे बंद केले. मात्र, ज्यावेळी अक्षय कुमारला माझ्या तब्येतीबद्दल समजले. त्याने मला थेट फोन केला. अक्षय कुमार याचे सतत मला फोन येत होते. मात्र, तो काळच इतका जास्त वाईट होता की, मला कोणाशीच बोलायचे नव्हते.

हेही वाचा- निधनापूर्वी सतीश कौशिक करत होते ‘तेरे नाम’च्या सीक्वेलची तयारी, सलमान खानचा खुलासा, म्हणाला, “त्यांनी स्क्रिप्ट…”

माझी आई म्हणाली की, अक्षय पाजीचा फोन आहे, तू एकदा बोलून घे ते नाही ऐकणार. शेवटी मी अक्षय कुमारचा फोन उचलला. अक्षय कुमारने मला काळजी घेण्याचा आणि साऊथमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. माझ्या या वाईट काळामध्ये अनेक कलाकरांनी माझी मदत केली. मी जरी फोन वापरत नव्हतो, तरीही ते माझ्या संपर्कात कायम राहत होते.

हेही वाचा- Video: “हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा…”; राखी सावंतने केलेला लुंगी डान्स पाहून नेटकरी हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुलाखतीत हनी सिंगने त्याच्या मानसिक आजार आणि वेदनादायी संघर्षावर भाष्य केलं आहे. इंडस्ट्रीमध्ये पुन्हा पाऊल ठेवल्यावर हनी सिंगने स्वतःमध्येसुद्धा बरेच बदल केले आहेत. मानसिक आजारादरम्यान हनी सिंगने अत्यंत कठीण प्रसंगांना तोंड दिलं आहे.