Rashmika Mandanna at Kuberaa Trailer Launch : लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा हे दोघे एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये आहेत, अशा चर्चा अनेकदा होत असतात. दोघांनी ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं, तेव्हापासून त्यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या. पण, या दोघांनी अनेकदा ते फक्त एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण असल्याचं सांगितलं आहे. अशातच नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान रश्मिका विजयबद्दल बोलताना लाजताना दिसली. यामुळे आता पुन्हा या जोडीच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

रश्मिकाने तिचा आगामी चित्रपट ‘कुबेरा’च्या ट्रेलर लाँचदरम्यान विजयबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिंदुस्थान टाईम्स’च्या वृत्तानुसार ‘कुबेरा’ चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान रश्मिकाला काही कलाकारांबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिकेने अभिनेत्रीला नागार्जुन यांच्यातील कोणती गोष्ट तुला आत्मसात करायला किंवा शिकायला आवडेल असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, “त्यांचा ऑरा आणि चार्म मला आत्मतास करायला आवडेल.” धनुषबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “त्याच्याकडून एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची कला शिकायला आवडेल.” आणि विजय देवरकोंडाबद्दल विचारल्यानंतर रश्मिका बराच वेळ लाजताना दिसली. अभिनेत्याचं नाव ऐकून ती लाजली व काही वेळ थांबून “त्याच्याकडून सगळं काही शिकायला आवडेल” असं उत्तर तिने दिलं.

रश्मिकाने दिलेलं उत्तर ऐकल्यानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये या दोघांच्या नात्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वीसुद्धा रश्मिका व विजय अनेकदा एकाच ठिकाणी स्पॉट झाल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघेही अनेकदा एकाच ठिकाणाचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करतानाही दिसले, त्यामुळे हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. यासह त्यांच्या एका चाहत्याने रश्मिका व विजय यांना एकाच ठिकाणी एकत्र जेवताना पाहिलं होतं व तो फोटो त्यावेळी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. परंतु, या दोघांनी अद्याप याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिली नसून त्यांनी अनेकदा एकमेकांचे फक्त मित्र-मैत्रीण असल्याचं सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रश्मिका मंदाना लवकरच शेखर कमुला यांच्या ‘कुबेरा’ या चित्रपटातून झळकणार आहे. हा चित्रपट २० जूनला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्यासह अभिनेता नागार्जुन, धनुष यांसारखे कलाकारही झळकणार आहेत; तर विजय देवरकोंडा ‘किंगडम’ या आगामी चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट येत्या ४ जुलै २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.