बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. रविना सध्या मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये शुटींगच्या निमित्ताने आली आहे आणि तिथले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत आहे. नुकतंच रविनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये रविना वेगवेगळ्या साड्या परिधान करून भोपाळच्या रस्त्यांवर धमाल करताना दिसत आहे. याबरोबरच रविना गरमागरम समोसा खाताना, तसेच भोपाळच्या रस्त्यावर स्कूटी चालवताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. इतकंच नाही तर रविनाला पाहून एक लहान मुलगी भावूक झाली हे आपल्याला पाहायला मिळतं. रविनाने त्या मुलीला ऑटोग्राफदेखील दिली.

आणखी वाचा : “पुष्पानंतर आता…” अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा मुलाखतीदरम्यान खुलासा

रविनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिचे चाहते या व्हिडिओवर रिअॅक्ट होत आहेत. तब्बल ५० हजाराहून लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला असून धकधक गर्ल माधुरी दीक्षित तसेच अभिनेता मानव वीजनेदेखील या व्हिडिओवर कॉमेंट केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या मात्र रविना अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अडचणीचं कारण ठरणार आहे नुकतीच तीने केलेली ताडोबाची सैर. सातपुडा व्याघ्र संवर्धन केंद्रामधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविनाने नियमांचं उल्लंघन करुन सफारीदरम्यान वाघांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामध्ये तपास सुरु करण्यात आला आहे.