सदाबहार अभिनेत्री रेखा यांचे असंख्य चाहते आहेत. सौंदर्यवती रेखा यांच्याबरोबर एखादा फोटो काढता यावा, असं चाहत्यांना वाटतं. नुकतंच रेखांना मुंबईत पापाराझींनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं. यावेळी एका चाहत्याला त्यांच्याबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. फोटो काढायला गेलेल्या त्या चाहत्याबरोबर रेखांनी केलेल्या कृतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

“तरुणपणी खूप उद्दाम होतं, म्हातारं झालं आणि लाचार…”, गश्मीर महाजनीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

रेखांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या एका इव्हेंटमधून बाहेर पडतात, तेव्हा पापाराझी फोटो व व्हिडीओ काढण्यासाठी गर्दी करतात. याचवेळी एक चाहता त्यांच्याबरोबर फोटो क्लिक करण्यासाठी येतो. फोटो काढल्यानंतर गमतीत रेखा त्याच्या गालावर प्रेमाने चापट मारतात.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी रात्री मुंबईत ग्लोबल स्पा अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. रेखा, जरीन खान, वाणी कपूर, मानुषी छिल्लर आणि रणदीप हुड्डा यांच्यासह अनेक कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या कार्यक्रमात रेखांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ग्रे रंगाच्या ड्रेसमध्ये रेखा खूपच सुंदर दिसत होत्या.