रेणुका शहाणे व आशुतोष राणा हे चित्रपटसृष्टीमधील बहुचर्चित जोडप्यांपैकी एक आहे. रेणुका व आशुतोष यांच्यांकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. कामामुळे सतत चर्चेत असलेल्या या दोन्ही बड्या कलाकारांनीही त्यांच्या खासगी आयुष्याबाबत बोलणं मात्र बऱ्याचदा टाळलं. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रेणुका यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबाबत पहिल्यांदाच बरेच खुलासे केले आहेत.
आणखी वाचा – ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद पटकावल्यानंतर एमसी स्टॅनचं पुण्यात पहिलं कॉन्सर्ट, एका तिकिटाची किंमत आहे तब्बल…
‘पिंकविला’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये रेणुका यांनी त्यांच्या पहिल्या लग्नाबाबत भाष्य केलं. त्याचबरोबरीने आई-वडिलांचा घटस्फोट, त्यांच्या स्वतःचाही घटस्फोट झाला असल्याचं रेणुका यांनी उघड केलं. आशुतोष यांच्या रेणुका यांनी दुसरं लग्न केलं. पण पहिल्या घटस्फोटानंतर त्यांचा प्रेम व लग्न याच्यावरचा विश्वास उडाला होता.
आणखी वाचा – सई ताम्हणकरच्या अफेअरच्या चर्चा, ‘त्या’ व्यक्तीबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली, “मला तुझी…”
मराठी नाट्यलेखक विजय केंकरे यांच्याशी रेणुका यांचं पहिलं लग्न झालं होतं. पण आशुतोष यांच्याबरोबर त्यांचं नातं कसं जुळलं हे एका मुलाखतीमध्ये अभिनेत्यानेच स्वतः सांगितलं होतं. पहिल्या भेटीनंतरच रेणुकाने मला आय लव्ह यु म्हटलं पाहिजे हे आशुतोष राणा यांनी मनाशी निश्चित केलं.
आशुतोष यांनी त्यांच्या प्रेमकथेचा एक किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, “रेणुका गोव्यामध्ये चित्रीकरण करत होती. त्याचदरम्यान मी फोनवर तिला एक कविता ऐकवली. या कवितेमध्ये मी नकार, शांतता, एकटेपणा या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला होता. ही कविता ऐकल्यानंतर तिने मला आय लव्ह यु म्हटलं होतं. तिचं हे वाक्य ऐकूनच मी आनंदाने वेडा झालो”. आशुतोष यांच्याबरोबर वयाच्या ३५व्या वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं. आज दोघंही सुखाचा संसार करत आहेत.