अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) मागच्या चार वर्षांत आयुष्यात अनेक वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं, त्यानंतर आता ती नव्याने सुरुवात करत आहे. शनिवारी रियाने तिचा नवीन पॉडकास्ट लाँच केला. या पॉडकास्टचं नाव तिने ‘चॅप्टर २’ असं ठेवलं आहे. २०२० मध्ये तिचा बॉयफ्रेंड व प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) आत्महत्या केली, त्यानंतर तिच्यावर अनेक गंभीर आरोप झाले, तिला अटकही झाली आणि ती या सगळ्यातून बाहेर आली. आता रिया उदरनिर्वाहासाठी काय करते, याबाबत तिने सांगितलं आहे.

रिया चक्रवर्तीला सप्टेंबर २०२० मध्ये कथित ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तिला ऑक्टोबर २०२० मध्ये जामीन मंजूर झाला होता. सुष्मिता सेनने हजेरी लावलेल्या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये रिया म्हणाली, “मी आता जगण्यासाठी काय काम करते, याबद्दल लोक गोंधळलेले दिसत आहेत. तर मी चित्रपटांमध्ये अभिनय करत नाही, मी इतर गोष्टी करते, मी मोटिव्हेशनल स्पीकर आहे आणि यातूनच मी पैसे कमावते.”

“१८व्या वर्षी मुलाखतीत सेक्स शब्द उच्चारला अन्…”, सुश्मिता सेनने सांगितला प्रसंग; म्हणाली…

पॉडकास्टचं नाव आयुष्यापासून प्रेरित असल्याचं रियाने सांगितलं. “प्रत्येकाला माझ्या आयुष्यातील ‘चॅप्टर वन’ माहित आहे किंवा त्यांना ते माहित आहे असं मी गृहीत धरते. मी आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांमधून गेले आणि स्वतःची अनेक रुपं पाहिली. आता मी स्वतःला आणखी जास्त अनुभवतेय आणि हे नवीन व्हर्जन पुनर्जन्मासारखं आहे. ज्यांच्या आयुष्यात ‘चॅप्टर टू’ आहे, अशा लोकांबरोबर मला हे सगळं सेलिब्रेट करायचं आहे. आयुष्यात ‘चॅप्टर टू’ असणे, आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करणे, जीवनात पुढे जाणे ठीक आहे. मला बदल साजरा करायचा आहे.”

बर्लिनमध्ये Naked Party मध्ये सहभागी झाली बॉलीवूड अभिनेत्री, २० मिनिटांत काढला पळ; म्हणाली, “मला कुणाचेही प्रायव्हेट पार्ट…”

लोकांच्या तिरस्काराबद्दल रिया चक्रवर्ती म्हणाली…

रियाला वाटतं की लोक तिचा तिरस्कार करत नाही तर तिने तिची जी प्रतिमा लोकांसाठी तयार केली होती, त्याचा तिरस्कार करतात. “त्यांना माझ्या प्रतिमेची अडचण होती, जी मी तयार केली होती. त्या प्रतिमेचे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावले,” असं रिया म्हणाली.

rhea chakraborty
रिया चक्रवर्ती (फोटो – इन्स्टाग्राम)

Video: ऐश्वर्या राय-आराध्या बच्चनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, बिग बींच्या नातीने वळून पाहिलं अन् पापाराझींना म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझ्याकडे सुपरपॉवर आहे – रिया चक्रवर्ती

“मी अनेकदा गमतीत म्हणते की माझ्याकडे एक मोठी सुपरपॉवर आहे. मी जेव्हा एखाद्या ठिकाणी जाते तेव्हा काही लोकांना वाटेल की, ‘हिने काहीतरी केलं आहे, ही ‘चुडैल’ आहे, काळी जादू करते’ आणि उर्वरित विचार करतील, ‘ती एक मजबूत मुलगी आहे, जी लढली, तिच्यात हिंमत आहे.’ पण यामुळे काहीच फरक पडत नाही हेही मला आता उमगलं आहे. जे माझ्यावर प्रेम करतात ते महान आहेत, जे माझा द्वेष करतात तेही ठिक आहेत. मला आता काहीही फरक पडत नाही,” असं रियाने नमूद केलं.