रिचा चड्ढा आणि अली फजल ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. नोंदणी पद्धतीने लग्न करून अडीच वर्षानंतर दोघांनी त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. २०२२ मध्ये लग्न करणाऱ्या या जोडप्याने आता गुडन्यूज दिली आहे. अली व रिचा लवकरच पालक होणार आहेत.

यामी गौतम आई होणार असल्याची बातमी नुकतीच समोर आली असून आता रिचा चड्ढा आणि अली फजल हे जोडपं लवकरच आई बाबा होणार असल्याचं समोर आलंय. याबाबत दोघांनीही त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अनोख्या पद्धतीने पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा… ‘या’ भीतीमुळे रवीना टंडनने नाकारलेलं ‘छैया छैया’ गाणं; खुलासा करत म्हणाली, “खूप विचित्र…”

शुक्रवारी रिचा आणि अलीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एकत्रित पोस्ट शेअर केली. पहिल्या फोटोत १ + १ = ३ असं लिहिलंय. तर दुसऱ्या फोटोत हे दोघे एकमेकांकडे पाहत रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. यात अलीने कलरफूल शर्ट आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा कोट घातला आहे तर रिचा काळ्या रंगाच्या फ्रिल स्लीव्ह्ज ड्रेसमध्ये दिसत आहे. या फोटोच्या शेवटी गरोदर असल्याचा इमोजी लावला आहे. श्वेता बसु प्रसाद, सैयामी खेर, श्रिया पिळगावकर आणि एलनाझ नोरोझी या कलाकारांनी कमेंट्स करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांची भेट फुकरेच्या सेटवर झाली होती. त्यांनी २०२०मध्ये नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यांनी नेटफ्लिक्स इंडिया ओरिजिनल शो ‘कॉल माय एजंट’च्या एका एपिसोडमध्ये एकमेकांसह स्क्रीन स्पेस देखील शेअर केली होती. अलीकडेच त्यांनी ‘व्हायरस २०६२’ या ऑडिबल थ्रिलर पॉडकास्टला त्यांचा आवाज दिला. पुरस्कार विजेत्या ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ या चित्रपटाची त्यांनी निर्मितीही केली.

हेही वाचा… लग्नानंतर तीन वर्षांनी यामी गौतम होणार आई; पती गूड न्यूज देत म्हणाला, “बाळाला माहीत असणार…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबद्दल हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रिचा म्हणाली होती की “या प्रोडक्शन हाऊसमध्ये एकत्र काम करणं सोपं नव्हतं. मी त्याला म्हणाले होते की कामासह आपलं वैयक्तिक आयुष्य जगणं सोपं असेल की नाही मला माहित नाही.”