Rimi Sen ruined her own career : २००० च्या दशकाच्या सुरुवातीला बॉलीवूडमध्ये एका सुंदर अभिनेत्रीने एंट्री घेतली. तिच्या सौंदर्याने आणि कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने अनेक चित्रपट केले, पण यशाच्या शिखरावर असताना तिने अभिनय सोडायचा निर्णय घेतला, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या अभिनेत्रीचं नाव म्हणजे रिमी सेन होय.

रिमी सेनचा जन्म २१ सप्टेंबर १९८१ रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे शुभमित्रा सेन म्हणून झाला. तिने आपल्या करिअरची सुरुवात जाहिरातींमधून केली आणि त्यानंतर २००३ साली तिने हिट चित्रपट ‘हंगामा’मधून पदार्पण केले. लवकरच ती सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली.

रिमीने हंगामानंतर ‘बागबान’, ‘धूम’, ‘गरम मसाला’, ‘क्योंकि’, ‘गोलमाल’ आणि ‘फिर हेरा फेरी’ सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ग्लॅमर आणि विनोद या रिमीच्या जमेच्या बाजू होत्या. कॉमिक आणि ग्लॅमरस भूमिकांमुळे रिमीचा चाहतावर्ग वाढला. रिमीचे सौंदर्य, तिचा अभिनय या गोष्टींनी प्रेक्षकांना भुरळ घातली. तिने अजय देवगणबरोबर ‘गोलमाल’ मध्ये स्क्रीन शेअर केली होती.

रिमी म्हणते – मी स्वतःचं करिअर बरबाद केलं

नवभारत टाईम्स ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत रिमी सेन सेन म्हणाली, “मी माझे स्वतःचे करिअर बरबाद केले.” अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करूनही, तिला वारंवार सारख्याच भूमिका येऊ लागल्या, त्यामुळे रिमी निराश झाली. शेवटी तिने यशाच्या शिखरावर असताना अभिनयाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. “माझ्या करिअरमध्ये मी जे निर्णय घेतले, त्याची जबाबदारी मी घेते,” असं रिमीने कबूल केलं.

चित्रपटांपासून दूर गेल्यापासून रिमी सेन लाइमलाईटमध्ये नाही. तिने चित्रपट निर्मिती केली. २०१५ मध्ये, ती रिअॅलिटी शो बिग बॉस ९ मध्ये दिसली होती. काही काळ या रिअॅलिटी शोमध्ये तिला चाहते पाहू शकले होते. रिमीचं करिअर उत्तम राहिलं, पण टाइपकास्ट झाल्याने तिला मोठा निर्णय घ्यावा लागला. स्टारडम, लोकप्रियतेचा अनुभव घेतल्यानंतर रिमीने अभिनय सोडला, पण त्यासाठी कुणालाही दोष न देता स्वतःला जबाबदार धरते. आज जरी ती चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी रिमी सेनचे नाव २००० च्या दशकातील यशस्वी हिरोईन्सपैकी एक म्हणून घेतले जाते.