मराठीसह बॉलीवूडमध्ये लोकप्रिय असणारी प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणून जिनिलीया व रितेश देशमुख यांना ओळखलं जातं. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील विविध गोष्टी हे रितेश – जिनिलीया चाहत्यांबरोबर शेअर करतात. नुकताच अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

रितेश – जिनिलीयाने अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. आता या जोडप्याला रियान व राहील अशी दोन मुलं आहेत. या जोडप्याच्या मुलांचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक होत असतं. विशेषत: रितेश-जिनिलीयाने आपल्या मुलांना उत्तम संस्कार केल्याचं नेहमी बोललं जातं. सध्या रितेशच्या मुलांचा एक नवीन व्हिडीओ चर्चेत आला आहे. यामध्ये रिहान व राहील यांनी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकरांची भेट घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : तगर व झेंडूच्या फुलांची ओढणी, पारंपरिक लूक अन्…; अंबानींच्या होणाऱ्या सुनेचं देखणं रुप, हळदी समारंभाचे फोटो व्हायरल

भारतीय संघाचे माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज सुनील गावसकर यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने आज त्यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. कसोटी सामन्यांमध्ये एकूण १० हजार धावा करणारे सुनील गावसकर हे पहिले फलंदाज होते. या दिग्गज खेळाडूला शुभेच्छा देण्यासाठी अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

सुनील गावसकरांबरोबरचा व्हिडीओ शेअर करत रितेश देशमुख लिहितो, “जेव्हा माझी मुलं माझ्या हिरोला भेटतात. या दिग्गज माणसाला ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! सुनीलजी तुम्हाला उत्तम आरोग्य अन् उदंड आयुष्य लाभो…”

हेही वाचा : सेटवर अमिताभ बच्चन यांनी ‘या’ गोष्टीसाठी परवानगी मागितली अन्…; ‘कल्की 2898 एडी’चे दिग्दर्शक झाले नि:शब्द, नेमकं काय घडलं?

हेही वाचा : अमेरिकेहून भारतात परतलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनी मालिकेत झळकणार? सेटवरील ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रितेश देशमुखच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, येत्या १२ जुलैला अभिनेता मुख्य भूमिकेत असलेली ‘पिल’ सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ‘वेड’नंतर रितेशने आणखी एका मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नाव ‘राजा शिवाजी’ असून पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला अजय-अतुल संगीत देणार आहेत. २०२५ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.