Genelia & Riteish Deshmukh : रितेश व जिनिलीया देशमुख यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. या दोघांची पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटादरम्यान झाली होती. ओळख, मैत्री अन् त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केल्यावर रितेश व जिनिलीया यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याला रियान आणि राहिल अशी दोन मुलं आहेत.

रितेश-जिनिलीया सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्यांचे इन्स्टाग्रामवरील मजेशीर रील्स व्हिडीओ सर्वत्र नेहमीच व्हायरल होत असतात. वैयक्तिक आयुष्यात, रितेश-जिनिलीया शाकाहारी असून त्यांनी काही वर्षांपूर्वी ‘इमॅजिन मीट्स’ हा प्लान्ट बेस्ड खाद्यपदार्थांचा ब्रँड सुरू करून जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल केले.

रितेश देशमुख हेल्दी राहण्यासाठी चहा-कॉफीचं सेवन देखील करत नाही. याविषयी जिनिलीयाने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता. रितेश आणि जिनिलीयाला सुरुवातीला, “तुम्ही आयुष्यभर कोणता एक पदार्थ खाऊ शकता? असा पदार्थ सांगा ज्याचा तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही…” हा प्रश्न विचारण्यात आला. यावर रितेशने वडापाव तर, जिनिलीयाने शेवपुरी मी कधीही खाऊ शकते हे उत्तर दिलं.

यानंतर या जोडप्याला “कॉफी की चहा? तुम्हाला काय आवडतं?” हा प्रश्न रॅपिड फायरमध्ये विचारण्यात आला. यावर जिनिलीया म्हणाली, “मी कॉफी पिते. रितेश चहा-कॉपी दोन्ही गोष्टी पीत नाही. तो ग्रीन टी पितो.”

अभिनेत्याने देखील तो कायम ग्रीन-टी पीत असल्याचं यावेळी मान्य केलं. याशिवाय देशमुख कुटुंबीयांचा आवडता पदार्थ ‘वडापाव विथ ठेचा’ आहे असंही यावेळी या दोघांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रितेश -जिनिलीयाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेता बहुप्रतीक्षित ‘हाऊसफुल ५’ सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा येत्या ६ जूनला प्रदर्शित होणार असून, यामध्ये दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. तर, जिनिलीया आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.