Riteish Deshmukh on Aryan Khan: अभिनेता रितेश देशमुख त्याच्या चित्रपटांसाठी, विविध धाटणीच्या भूमिकांसाठी लोकप्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तो अनेकदा व्यक्त होत असतो, त्यामुळे तो बऱ्याचदा चर्चेत असतो. त्याच्या कुटुंबाचीदेखील मोठी चर्चा होताना दिसते.

आता अभिनेत्याने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे कौतुक केले आहे. रितेश देशमुखने इन्स्टाग्राम स्टोरीवर आर्यन खान दिग्दर्शित ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या शोचा ट्रेलर शेअर केला आहे.

रितेश देशमुखची शाहरुख खानच्या मुलाला दिल्या शुभेच्छा

हा ट्रेलर शेअर करताना त्याने आर्यन खानला टॅग केले आणि लिहिले, “प्रिय आर्यन, दिग्दर्शक म्हणून तुझे पदार्पण हे तुझ्या सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. तुझ्या दृष्टिकोनाचे, तुझ्या धाडसाचे, तुझ्या कथांवर प्रभाव असू दे. तुला खूप यश मिळावे, तुझ्या कामात नेहमीच सर्जनशीलता असावी, यासाठी मी तुला शुभेच्छा देतो. तुझ्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी हे जग तयार आहे.

पुढे त्याने गौरी खान व शाहरुख खान यांना टॅग करत लिहिले की, हा किती अभिमानाचा क्षण आहे. द बॅड्स ऑफ बॉलीवूड हा शो मी बघेन. नेटफ्लिक्स इंडिया आणि रेड चिली एंटरटेनमेंट तसेच संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा, असेही त्याने लिहिले.

आर्यन खानने ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या कार्यक्रमातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. आर्यन खानच्या शोची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा होती. नुकताच या शोचा लॉंच सोहळा प्रदर्शित झाला. या सोहळ्यात शाहरुख खान आणि गौरी खानदेखील उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमातील कलाकारांनीदेखील या सोहळ्यात हजेरी लावली होती. बॉबी देओलदेखील या कार्यक्रमात दिसणार आहे.

या सोहळ्यात बॉबी देओलने आर्यन खानला मनोरंजनसृष्टीत पदार्पण करताना पाहून आनंद होत असल्याचे सांगितले. आर्यनला लहानाचे मोठे होताना पाहिले आहे, आता त्याला काम करताना पाहताना छान वाटत असल्याच्या भावना बॉबी देओलने व्यक्त केल्या.

तसेच, या सोहळ्यातील शाहरुख खान व आर्यन खानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. शाहरुख आणि आर्यन यांच्यातील बॉण्डिंग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. याबरोबरच आर्यनचा लूक, त्याचा आवाज आणि त्याची स्टाइल यामुळे तो अगदी शाहरुखसारखाच दिसत असल्याचे म्हटले जात आहे.

आर्यन खान दिग्दर्शित हा शो नेटफ्लिक्सवर १८ सप्टेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या ट्रेलरला ज्या पद्धतीने प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत, प्रतिसाद मिळत आहे; तसाच प्रतिसाद त्याच्या शोला मिळणार का, या शोमध्ये नेमके काय पाहायला मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.