Riteish Deshmukh : मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून रितेश देशमुखला ओळखलं जातं. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही वर्षांत रितेशने त्याच्या अभिनयासह रुबाबदार शैलीने भल्याभल्यांना वेड लावलं आहे. तो उत्तम अभिनेता आहेच पण, याचबरोबर ‘परफेक्ट फॅमिली मॅन’ म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं.

रितेश ( Riteish Deshmukh ) नेहमीच आपल्या कुटुंबीयांना खंबीरपणे साथ देतो. कुटुंबातील प्रत्येकाच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर करत रितेश-जिनिलीया आपलं मन मोकळं करत असतात. आज लाडक्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने एक पोस्ट लिहिली आहे. रितेशचा मोठा मुलगा रियान आज त्याचा १० वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने रितेशने लेकाबरोबरचं बॉण्डिंग सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : भुवनेश्वरीचं सत्य उघड होणार? सासूचा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी अक्षराने केलं असं काही…; पाहा मालिकेचा प्रोमो

रितेश देशमुख लिहितो, “माय डिअर रियान… मी तुम्हा सर्वांबरोबर आज एक सिक्रेट शेअर करणार आहे आणि ही गोष्ट मी तुम्हाला अगदी खरेपणाने आणि प्रामाणिकपणे सांगणार आहे. माझ्यातही दोष आहेत, मी परफेक्ट नाही. पण, आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी मला तुमच्यासाठी काहीतरी खास, अधिक चांगलं करावंसं वाटतं.”

“पण, जेव्हा मी माझ्या मुलांच्या दृष्टीकोनातून विचार करतो तेव्हा मला मी स्वत:ला नक्कीच एक परफेक्ट बाबा समजतो. कारण, माझी मुलं माझ्यावर प्रचंड प्रेम करतात. नेहमी माझं कौतुक करतात…पिल्लू, तुझ्यामुळे मी या जगातील सर्वोत्तम बाबा असल्याची फिलिंग माझ्या मनात येते. कारण, तुझा ( रियान ) माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. तू खूप स्ट्राँग आहेस आणि तुझ्याकडे पाहून मला नेहमीच असं वाटतं की, मी काहीतरी बरोबर करतोय. आयुष्यात तुझ्याबरोबर अनुभवलेले थरारक प्रसंग, आपला एकत्र आनंद, तुझ्याबरोबर खेळलेले हजारांहून अधिक फुटबॉलचे सामने या सगळ्यामुळे मी तुझा आता मित्र झालो आहे आणि तू माझा आयुष्यभरासाठी साथीदार… बाळा, तुझ्यासाठी या जगातलं कठीणातलं कठीण शिखर सर करण्याची शक्ती माझ्यात आहे. कारण, तू माझं आयुष्य खूप सुंदर बनवलं आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मला तुझा बाबा म्हणून निवडलंस…यासाठी तुझे खूप खूप आभार.” असं लिहित रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : “तुझी सर्वात मोठी चिअरलीडर…”, लाडक्या लेकाच्या वाढदिवशी जिनिलीया देशमुखची खास पोस्ट; म्हणाली, “मला आई होऊन…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रितेशप्रमाणे ( Riteish Deshmukh ) रियानला शुभेच्छा देण्यासाठी त्याची आई जिनिलीया, काकी दीपशिखा यांनी देखील पोस्ट शेअर केल्या आहेत. अभिनेत्याच्या पोस्टवर सुद्धा कमेंट्स करत बॉलीवूड सेलिब्रिटींनी रियानवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.