Genelia & Riteish Deshmukh : जिनिलीया व रितेश देशमुख यांची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रितेश-जिनिलीयाचे मजेशीर रील्स व्हिडीओ चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. या जोडप्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं.

एकमेकांना जवळपास १० वर्षे डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांची पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. या जोडप्याला रियान अन् राहील अशी दोन मुलं आहेत. जिनिलीयाने लग्नानंतर सासरी आल्यावर मराठी संस्कृती, परंपरा, रितीरिवाज या सगळ्या गोष्टी मोठ्या आवडीने शिकून घेतल्या, असं स्वत: रितेशने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. याशिवाय अभिनेत्री मराठी सण देखील हौसेने साजरे करते.

जिनिलीयाने नुकतीच वटपौर्णिमा साजरी केली. राहत्या घरी वटसावित्रीची पूजा करून तिने रितेशसाठी प्रार्थना केली. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. जिनिलीयाने या पोस्टमध्ये “आय लव्ह यू रितेश” म्हणत पतीला टॅग केलं आहे.

जिनिलीयाचा हाच व्हिडीओ रितेशने त्याच्या इन्स्टाग्रावर रिशेअर करत बायकोसाठी खास पोस्ट लिहिली आहे. रितेश लिहितो, “प्रिय बायको…मी खरंच भाग्यवान आहे कारण, तू माझ्या आयुष्यात आहेस…तुझ्यामुळे मी खरंच खूप आनंदी आहे. तू माझा आधार आहेस, शक्ती आहेस अन् माझं संपूर्ण जगं आहेस. आय लव्ह यू”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
genelia
पत्नी जिनिलीयासाठी रितेश देशमुखची खास पोस्ट ( Genelia & Riteish Deshmukh )

दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेता नुकताच ‘हाऊसफुल ५’ चित्रपटात झळकला. हा मल्टीस्टारर सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. याशिवाय जिनिलीया आमिर खानच्या ‘सिंतारे जमीन पर’ या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या दोघांचा ‘राजा शिवाजी’ सिनेमा पुढच्या वर्षी १ मे २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची निर्मिती जिनिलीया देशमुख व ज्योती देशपांडे करणार आहेत.