काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कलाकाराच्या घटस्फोटाशी संबंधित बातम्या समोर येत आहेत. ‘गजनी’ फेम अभिनेत्री असिन थोट्टूमकल हिच्या घटस्फोटाशी संबंधित चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच लोकप्रिय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर व अभिनेत्री कुशा कपिलानं घटस्फोटाची घोषणा केली. आता ‘पीके’, ‘८३’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीनं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.

अभिनेत्री रुखसार रेहमान आणि चित्रपट दिग्दर्शक फारूक कबीर यांचा १३ वर्षांचा संसार आता मोडणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासून दोघे वेगवेगळे राहत आहेत. अभिनेत्रीच्या एका जवळच्या व्यक्तीनं सांगितलं, “काही गोष्टींमध्ये रुखसार तडजोड करू शकत नव्हती. त्यामुळे तिनं घटस्फोट घेण्याचं ठरवलं आहे. सध्या तिची मनस्थिती ठीक नाही.”

हेही वाचा – Video: अभिनेत्री अदा शर्मानं आषाढी एकादशीनिमित्तानं दिल्या खास शुभेच्छा; गायलं ‘रखुमाई रखुमाई’ गाणं

रुखसारनं स्वतः या घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘ई-टाइम्स’शी बोलताना रुखसार म्हणाली, “हो, आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही फेब्रुवारी महिन्यापासून वेगळं राहत आहोत. आता घटस्फोट घेण्याच्या प्रक्रियेत आहोत. त्यामुळे मी आता यावर जास्त काही बोलणार नाही. हा निर्णय घेणं माझ्यासाठी खूप कठीण होत. त्यामुळे मी आता याबाबत अधिक माहिती देऊन याला वेगळं वळणं देऊ इच्छित नाही.” या घटस्फोटाबाबत फारूकनंही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “मी खासगी आयुष्याबाबत जास्त काही बोलत नाही. त्यामुळे यावर मला काही बोलायचं नाही.”

हेही वाचा – ‘कौन बनेगा करोडपती १५’मध्ये होणार मोठा बदल, बिग बींनी केलं जाहीर; पाहा नवा प्रोमो

रुखसार आणि फारूकचं लग्न मार्च २०१० साली झालं होतं. सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघे लग्नबंधनात अडकले होते. गेल्या वर्षी पहिल्यांदाच रुखसार आणि फारूकनं एकत्र ‘खुदा हाफिज २’मध्ये काम केलं होतं.

हेही वाचा – ‘बिग बॉस ओटीटी २’मधून बाहेर येताच आलिया सिद्दिकीचा सलमान खानवर गंभीर आरोप; म्हणाली, “त्यानं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रुखसारचं फारूकबरोबरच हे दुसरं लग्न आहे. असद अहमद हा तिचा पहिला पती आहे. रुखसारला असदपासून २७ वर्षांची मुलगी आयशा अहमद आहे; जी अभिनेत्री आहे.