बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने ‘बरेली की बर्फी’, ‘लुका-छुपी’, ‘मिमी’ या चित्रपटांच्या माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. चित्रपटसृष्टीत कोणाच्याही पाठिंब्याशिवाय स्वत:ची एक वेगळी ओळख तिने निर्माण केली. क्रिती आज आपला ३३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ‘मिमी’ चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने क्रितीबरोबर महत्त्वाची भूमिका साकारली होती. तेव्हापासून या दोघींमध्ये चांगली मैत्री आहे. यामुळेच क्रितीच्या वाढदिवसानिमित्त सईने खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “‘गदर’ला काहीजण ‘गटर’ बोलायचे”, अमीषा पटेलने केला खुलासा; म्हणाली, “सलग ६ महिने, दररोज १२ तास…”

सई ताम्हणकरने ‘मिमी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फोटो शेअर करत क्रितीला शुभेच्छा दिल्या आहेत. सई लिहिते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुंदरी!, अशीच प्रगती कर…कायम तू आहेस तशीच राहा कारण, मनाने सुद्धा तू खूप सुंदर आहेस. तुला माझ्याकडून खूप खूप प्रेम” पुढे तिने क्रितीला या पोस्टमध्ये टॅग केले आहे.

हेही वाचा : Video : “पाजी तुस्सी…”, ‘गदर २’चा ट्रेलर रिलीज झाल्यावर सनी देओल भावुक; अमीषा पटेलने पुसले डोळे, व्हिडीओ व्हायरल

क्रितीच्या वाढदिवसानिमित्त आज तिच्यावर संपूर्ण चित्रपटसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये क्रिती तिच्या मांडीवर बसलेली पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघींमध्ये चांगली मैत्री झाल्याचे लक्षात येते. सईने या चित्रपटात क्रिती सेनॉनच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. ‘मिमी’ चित्रपटातील ‘शमा’च्या भूमिकेसाठी सईला मानाचा ‘आयफा पुरस्कार’देखील मिळाला होता.

हेही वाचा : Gadar 2 Trailer : “…तर अर्ध्याहून जास्त पाकिस्तान खाली होईल”, ‘गदर २’ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, सनी देओलच्या जबरदस्त ॲक्शनने वेधले लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सईने शेअर केलेल्या फोटोवर क्रितीने ‘धन्यवाद’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. वाढदिवसानिमित्त क्रिती सेनॉनला ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊत, डिझाईनर मनीष मल्होत्रा आणि अन्य कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच ती शाहिद कपूरबरोबर एका नव्या चित्रपटात झळकणार आहे.