अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खान ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. दोघेही अनेकदा एकमेकांबरोबर आणि मुलांबरोबर खास वेळ घालवताना दिसतात. ते प्रवास करताना विमानतळावर किंवा शहरातील काही ठिकाणी पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होतात. अनेकदा मुलांबरोबर ते ट्रिपवर जातात. शूटिंगच्या निमित्ताने दोघांचा प्रवास होत असतो.

नुकताच करीना व सैफचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते त्यांच्या बिल्डिंगबाहेर लिपलॉक करताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्यांना खूप ट्रोल केलं होतं. अशातच सैफचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यानंतर नेटकरी या जोडप्यात आलबेल नसल्याच्या कमेंट्स करत आहेत. फोटोमध्ये सैफच्या हातावर करीनाच्या नावाचा टॅटू दिसत नाही, त्याऐवजी वेगळाच टॅटू पाहायला मिळतोय.

जान्हवी कपूरच्या काकूचं पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल विधान; म्हणाली, “संजयने आजवर अनेक महिलांना…”

सैफ अली खानच्या हातावरील टॅटू बदलला

सैफ अली खान नुकताच विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला. तिथला त्याचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्याच्या हातावर करीनाच्या नावाच्या टॅटूऐवजी एक वेगळाच टॅटू दिसत आहे. हे पाहिल्यानंतर चाहत्यांनी सैफ अली खान आणि करीना घटस्फोट घेणार असल्याच्या कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. सैफच्या हातावरील टॅटू पाहता तो त्याच्या नवीन चित्रपटासाठी मॉडीफाय केलेला असू शकतो, असं दिसतंय.

“तो माझ्यापेक्षा जास्त यशस्वी असला तरी…”, अनिल कपूरबद्दल भाऊ संजयचं विधान; म्हणाला, “अर्जुन, सोनम किंवा जान्हवी…”

यूजर्सच्या प्रतिक्रिया

सैफ अली खानच्या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं, ‘या दोघांमध्ये काही झालं आहं का?’ तर दुसऱ्याने ‘तू तिसरं लग्न करणार आहेस का?’ अशी कमेंट केली. ‘या दोघांमध्ये सर्व काही ठीक असावं,’ असं एका नेटकऱ्याने लिहिलं. ‘काही दिवस थांबा, टॅटू बदललाय नंतर पत्नीही बदलेल,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

saif ali khan viral tattoo
सैफ अली खानच्या फोटोवरील कमेंट्स

“होय, त्याने प्रीती झिंटाला डेट केलं होतं,” प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबाबत खुलासा; म्हणाली, “मी त्या दोघांच्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सैफने करीनाशी केलं दुसरं लग्न

सैफ अली खानने १२ वर्षांपूर्वी २०१२ मध्ये करीना कपूरशी दुसरं लग्न केलं. ‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. या जोडप्याला तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोन मुलं आहेत. सैफ अली खानने पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंहशी केलं होतं. सैफने त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या अमृताशी लग्नगाठ बांधली होती. या जोडप्याला सारा अली खान व इब्राहिम अली खान ही दोन अपत्ये आहेत. सारा व इब्राहिम त्यांच्या आईबरोबर राहतात. साराचा लहान भाऊ इब्राहिम लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.