Salman Khan met Arbaaz Khan Sshura Khan new born daughter : अरबाज खान नुकताच बाबा झाला आहे. अरबाजची दुसरी पत्नी शुरा खान हिने रविवारी, ५ ऑक्टोबर रोजी मुलीला जन्म दिला. लेकीच्या आगमनाने खान कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. भावाच्या लाडक्या लेकीला भेटायला सलमान खान रुग्णालयात पोहोचला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अरबाज खानचा मोठा भाऊ सलमान खानने शुरा खान व तिच्या मुलीची हिंदुजा रुग्णालयात भेट घेतली. काळ्या रंगाच्या जीन्स व टी-शर्टमध्ये पोलीस व सुरक्षा रक्षकांसह सलमान खान रुग्णालयात पोहोचला. अरबाजच्या लेकीची भेट घेऊन तो रुग्णालयातून बाहेर आला, तेव्हाचे त्याचे व्हिडीओ पापाराझींनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

चाहते सलमान खानच्या या व्हिडीओंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

पाहा व्हिडीओ

दरम्यान, शुरा खानला शनिवारी, ४ ऑक्टोबर रोजी हिंदुजा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. तिच्याबरोबर अरबाज खान रुग्णालयात होता. तसेच शुराची आई व तिची मोठी लेकदेखील रुग्णालयात पोहोचले होते.

शुराच्या मुलीच्या जन्मानंतर सोहेल खान रुग्णालयात आला होता. अरबाज खान व मलायका अरोराचा मुलगा अरहान खान आपल्या लाडक्या बहिणीला भेटायला रुग्णालयात आला होता. त्यानंतर सोहेल खानचा मुलगा निर्वाण खान, सलमान खानची सावत्र आई हेलन व खान कुटुंबातील इतर सदस्यही मुलीला भेटायला रुग्णालयात आले. आता भाईजाननेही कुटुंबातील सर्वात छोट्या सदस्याची भेट घेतली.

दरम्यान, अरबाज खानने मलायका अरोराशी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये त्याने शुरा खानशी दुसरं लग्न केलं. शुरा खान ही सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. तिने बरीच वर्षे अभिनेत्री रवीना टंडनबरोबर काम केलंय. ‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर अरबाज व शुराची भेट झाली. दोघे एकमेकांना डेट करू लागले आणि नंतर त्यांनी लग्न केलं. आता लग्नाच्या जवळपास दोन वर्षांनी ते एका गोंडस मुलीचे आई-वडील झाले आहेत. चाहते या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.