अभिनेता सलमान खान लवकरच ‘बिग बॉस १७’ चा होस्ट म्हणून टीव्हीवर दिसणार आहे. तसेच त्याचा ‘टायगर ३’ चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानने टक्कल केलेला लूक मध्यंतरी व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये तो डान्स करताना दिसत आहे.
“कोणाबरोबरही झोपायला जबरदस्ती…”, नीना गुप्ता यांनी कास्टिंग काउचबद्दल केलेले विधान
सलमान खानने नुकतंच नवी दिल्लीत एका उद्योगपतीच्या नातवाच्या वाढदिवसाची पार्टीत डान्स केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान खान दबंगमधील ‘हमका पीनी है’ आणि ‘वॉन्टेड’मधील ‘जलवा’ यासह त्याच्या चित्रपटांमधील हिट गाण्यांवर डान्स करताना दिसतो.
सलमानने खानने या इव्हेंटमध्ये केलेल्या डान्सचे व्हिडीओ त्याच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सुरुवातीला सलमानने कोणाच्या तरी लग्नाच्या कार्यक्रमात परफॉर्म केलं होतं, परंतु नंतर त्याने वाढदिवसाच्या पार्टीत पाहुण्यांचे मनोरंजन केले होते अशी माहिती समोर आली.
दरम्यान, सलमान लवकरच ‘टायगर ३’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा टायगर फ्रँचायझीमधील तिसरा भाग आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी देखील प्रमुख भूमिकेत आहेत आणि यावर्षी दिवाळीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.