सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ आज २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच चित्रपट पहिल्या दिवशी किती रुपयांची कमाई करेल, याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती, त्यामुळे हा चित्रपट त्याचे रेकॉर्ड मोडणार की नाही, याबद्दलही चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – “जनता त्याला लायकी दाखवेल”; बॉलिवूड अभिनेत्याची सलमान खानवर टीका, म्हणाला, “‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचा निर्माता…”

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट पहिल्या दिवशी १२ ते १८ कोटी रुपयांची कमाई करेल, असा चित्रपटसृष्टीतील व्यापार तज्ज्ञांचा अंदाज आहे. खरं तर सलमान खानच्या चित्रपटासाठी हा आकडा खूपच कमी आहे पण कदाचित रमजान सुरू असताना चित्रपट प्रदर्शित होत असल्याने त्याचा फटका बसू शकतो. ईद शनिवारीच साजरी केली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यादिवशी चित्रपटाचं कलेक्शन दुप्पट होण्याची आशा व्यापार तज्ज्ञांना आहे.

Videos: शाहरुख खान ते बच्चन कुटुंब, बॉलिवूड कलाकारांनी वाहिली पामेला चोप्रांना श्रद्धांजली, सासूच्या निधनाने कोलमडली राणी मुखर्जी

चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग चांगलं झालंय, त्यामुळे पहिल्या दिवशी १५ ते १८ कोटींची कमाई चित्रपट करेल. ट्रेड अॅनालिस्ट अतुल मोहन म्हणाले, “शुक्रवारी चंद्रदर्शन होईल अशी आशा आहे. त्यामुळे चित्रपटाचे कलेक्शन दुसऱ्या टप्प्यात किंवा संध्याकाळनंतर वाढेल. पण प्राथमिक अंदाजाप्रमाणे चित्रपट १५-१८ कोटी रुपयांची कमाई करेल. हा चित्रपट ४५०० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. तसेच पुढील पाच-सहा आठवड्यांपर्यंत कोणतेही मोठे चित्रपट रिलीज होणार नाहीत. त्यामुळे या चित्रपटाला कमाई करण्याची चांगली संधी आहे.”

चित्रपट प्रदर्शक अक्षय राठी म्हणाले, “चित्रपट रमजानमध्ये प्रदर्शित होत आहे, त्यामुळे पहिल्या दिवसाची कमाई कमीच असेल. शुक्रवारी चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी असेल. चित्रपट १२ ते १५ कोटींचे ओपनिंग कलेक्शन करू शकतो आणि शनिवारी त्याच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपट २५ कोटी रुपयांपर्यंत कमाई करू शकतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तज्ज्ञांनी वर्तवलेले अंदाज पाहता चित्रपट पहिल्या दिवशी जास्त गल्ला जमवू शकेल, अशी चिन्हे नाहीत, त्यामुळे पठाणच्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा या चित्रपटाच्या कमाईचा आकडा कमी असेल.