बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर ३’ उद्या म्हणजे १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. ‘टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाप्रमाणेच टायगर ३ मध्येही प्रेक्षकांना सलमान आणि कतरिनाचा अॅक्शन लूक बघायला मिळणार आहे. ‘टायगर ३’ च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून मोठी कमाई केली आहे.

हेही वाचा- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाने ३६ व्या आरोपीला मंजूर केला जामीन, न्यायमूर्ती म्हणाले…

भारतात ५ नोव्हेंबर २०२३ पासून ‘टायगर ३’ च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत ‘टायगर ३’ ची सुमारे ५ लाख ८६ हजार ६५० तिकिटे बूक झाली आहेत. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने १५ कोटी ५८ लाख रुपयांची कमाई केली आहे. ॲडव्हाॅन्स बुकिंग पाहता पहिल्याच दिवशी हा चित्रपट मोठी कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘टायगर ३’ पहिल्याच दिवशी भारतात जवळपास ३५ कोटींची कमाई करू शकतो, तर जगभरात १०० कोटींचा व्यवसाय करण्याची शक्यता आहे. तर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५७ कोटींचा, तर ‘जवान’ने ७५ कोटींचा व्यवसाय केला होता.

शाहरुखबरोबर हृतिक रोशन करणार कॅमिओ

‘टायगर ३’ मध्ये शाहरुख खानबरोबर हृतिक रोशनही कॅमिओ करणार आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तर हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ मध्ये शाहरुख आणि सलमान कॅमिओ करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- ‘गब्बर’ हे नाव कसं सुचलं आणि अमजद खानची निवड कशी झाली? सलीम-जावेद यांनी सांगितला ‘शोले’चा किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘वार’ आणि ‘पठाण’ नंतर ‘टायगर 3’ हा यश राज फिल्मस स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. टायगर ३ मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफशिवाय इमरान हाश्मीचीही मुख्य भूमिका आहे. टायगर ३ मध्ये सलमान आणि कतरिनाबरोबर इमरानचेही अॅक्शन सीन्स बघायला मिळाणार आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ हिंदीबरोबरच तामिळ व तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे.