सलमान खान हा गेले काही महिने त्याच्या आगामी चित्रपटांसाठी खूपच चर्चेत आहे. ‘टायगर ३’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची घोषणेपासून चर्चा होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील सलमानचा लूकही समोर आला होता. तर आता या चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. पण या गाण्यामुळे सलमान चांगलाच ट्रोल होऊ लागला आहे.

या चित्रपटातील ‘बिल्ली बिल्ली’ हे गाणं आज प्रदर्शित झालं. हे गाणं सुखबीरने गायलं असून संगीत देखील त्याचंच आहे. तर या गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहे. काल सलमानने या गाण्याचा एक टीझर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. टीझरमध्ये हे गाणं चाहत्यांना आवडलं होतं. पण संपूर्ण गाणं समोर आल्यावर चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला आणि त्यांनी आता या गाण्याला आणि सलमानला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा : Video: प्रदर्शनाआधीच सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘टायगर ३’ चित्रपटाची व्हिडीओ क्लिप लीक, पाहा अभिनेत्याचा डॅशिंग अंदाज

या गाण्यात श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी, बिग बॉस फेम शहनाझ गिल, भाग्यश्री, सलमान खान आणि पूजा हेगडे दिसत आहेत. पण हे गाणं प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी यावर नकारात्मक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एका नेटकाऱ्याने कमेंट करत लिहीलं, “सलमान खान आणखी एका गाण्याचा आणि आणखी एका चित्रपटाचा रिमेक घेऊन आला आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “भाई वेडा झालं आहे का? काहीही काय गाणी घेऊन येत आहे!” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “यापेक्षा पहिलं गाणं बरं होतं.”

हेही वाचा : लग्न सिद्धार्थ-कियाराचं पण चर्चा ईशा अंबानीच्या साधेपणाची, विवाहसोहळ्यातील Unseen Photo व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘किसी की भाई किसी की जान’मध्ये सलमान खान आणि पूजा हेगडेबरोबरच व्यंकटेश दग्गुबती, पलक तिवारी, शहनाज गिल आणि बॉक्सर विजेंदर सिंग देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. साजिद नाडियादवाला याची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.