scorecardresearch

Video: प्रदर्शनाआधीच सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘टायगर ३’ चित्रपटाची व्हिडीओ क्लिप लीक, पाहा अभिनेत्याचा डॅशिंग अंदाज

गेले अनेक महिने या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. पण अशातच आता या चित्रपटातील एक व्हिडीओ लीक झाला आहे.

tiger 3 viral bts

अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहेत. गेले अनेक महिने त्याचे चाहते ‘टायगर ३’ची वाट पाहत आहेत. ‘टायगर ३’ हा चित्रपट यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. गेले अनेक महिने या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. पण अशातच आता या चित्रपटातील एक व्हिडीओ लीक झाला आहे.

‘एक था टायगर’ आणि ‘टायगर झिंदा है’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर सलमान खानने ‘टायगर ३’ची काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती. तर त्यानंतर या चित्रपटाबद्दलचे विविध अपडेट्स सलमान सोशल मिडियावरून चाहत्यांना देत होता. या चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मी नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं. पण आता या चित्रपटाची एक क्लिप खूप व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : प्रदर्शनाआधीच सलमान खानच्या ‘टायगर ३’ने कमावले ‘इतके’ कोटी, ‘पठाण’लाही टाकलं मागे

सेटवरून लीक झालेला हा व्हिडीओ एका खोलीतील असल्याचं दिसत आहे. या खोलीत आजूबाजूला धूर दिसत आहे आणि त्यात इमरान हाश्मी वावरताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर एखाद्या धमाकेदार सीनची तयारी सुरु असल्याचं लक्षात येत आहे. काही सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. यावर चाहतेही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून सर्वजण या चित्रपटासाठी आणखी उत्सुक झाले आहेत.

हेही वाचा : सलमान खानबरोबर स्क्रीन शेअर? अजिबात नको…या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी नाकारले त्याचे चित्रपट

‘एक था टायगर’ आणि ‘टायगर झिंदा है’ हे दोन्ही चित्रपट प्रचंड गाजले होते. या दोन्ही चित्रपटांनी मोठा गल्ला जमवला होता. या दोन्ही चित्रपटांचे यश बघता ‘टायगर ३’ही सुपरहिट होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. आधीच्या दोन्ही चित्रपटयांप्रमाणेच या चित्रपटातही सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी पहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 11:03 IST
ताज्या बातम्या