सध्या ईदनिमित्त बॉलीवूडमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक बड्या स्टार्सनी कलाकारांना ईदनिमित्त पार्टीचं आयोजन केलं. तर काल आमिर खानने सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेटही घेतली. या दरम्यानचे त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या ईदच्या दिवशी सलमान खानने आमिर खानला एक मौल्यवान भेट दिली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि तिचा नवरा आयुष शर्मा यांनी काल सर्वांना ईदची ग्रँड पार्टी दिली. यावेळी अनेक बॉलीवूड स्टार्स उपस्थित होते. या वेळेचा आमिर खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे त्याच्या हातात सलमान खानचं निळ्या रंगाचं लकी ब्रेसलेट दिसत आहे.

आणखी वाचा : सलमान खानसाठी ईद ठरली खास! ‘किसी का भाई किसी की जान’च्या कमाईत मोठी वाढ, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

सलमान खान काल या पार्टीत आला तेव्हा त्याच्या हातात ते ब्रेसलेट दिसत नव्हतं. त्यामुळे हे ब्रेसलेट आता सलमानने आमिर खानला भेट म्हणून दिलं असं त्यांचे चाहते म्हणू लागले आहेत.

हेही वाचा : “मला सलमान खानशी लग्न करायचंय…” प्राजक्ता माळीचं वक्तव्य चर्चेत; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान खान आणि आमिर खान यांच्या या दोन्ही व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. सलमानने त्याचं हे ब्रेसलेट आमिर खानला दिल्यामुळे त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तर अनेकांनी सलमानने आमिरला दिलेल्या या मौल्यवान भेटीबद्दल त्याचा कौतुक केलं.