Salman khan birthday special: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ५७ वा वाढदिवस आहे. काल रात्री त्याने त्याचे नातेवाईक आणि जवळची मित्र मंडळी यांच्याबरोबर मिळून त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. त्याचे चाहतेही त्याच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. अनेक वर्ष तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. परंतु त्याचा हा प्रवास सोपा नव्हता.

सलमान खान हा आज बॉलिवूडमधील बिग बजेट अभिनेत्यांच्या यादीत गणला जातो. एका चित्रपटासाठी तो खूप मोठं मानधन आकारतो. त्याच्या संपत्तीबद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल असतं. मुंबईत आलिशान बंगला, लोणावळ्यामध्ये मोठं फार्महाऊस अशी एकूण त्याची काही कोटींची आहे. पण आज कोट्यावधी कमावणाऱ्या सलमान खानची पहिली कमाई ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

हेही वाचा : Video: “मी त्याला शुभेच्छा का देऊ…?” सलमान खानच्या वाढदिवशी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला संताप अनावर

सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटामुळे त्याला ओळख मिळाली. परंतु त्याआधी काम मिळवण्यासाठी सलमान खूप प्रयत्न करत होता. त्यावेळी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात तो बॅकग्राऊंड डान्सर म्हणून नाचला. हे काम करण्यासाठी त्याला ७५ रुपये मिळाले होते. हे ७५ रुपये म्हणजे त्याची पहिली कमाई होती, असल्याने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत उघड केलं होतं.

आणखी वाचा : ट्रॅफिकमध्ये अडकल्याने संतापलेल्या यशने बंदूक काढली अन्…; ‘केजीएफ’ फेम अभिनेत्याने सांगितला किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७५ रुपयांपासून झालेली ही सुरुवात ते आज काही कोटींचा मालक हा त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. रस्त्याचे असंख्य चाहते त्याच्याकडे एक आदर्श म्हणून बघतात.