अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी (१४ एप्रिलला) पहाटे गोळीबार झाला होता. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता. आता याप्रकरणी गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. या आरोपींची ओळख पटवण्यात आली असून यासंदर्भात पोलिसांनी व्हिडीओही शेअर केला आहे.

‘एएनआय’ने एक्सवर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये क्राइम ब्रांचचे अधिकारी दोन आरोपींना पकडून दिसत आहेत. अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने गुजरातच्या भुज येथून अटक केली आहे. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी या दोघांची नावं आहेत. त्यांचा व्हिडीओ भुज पोलिसांनी शेअर केला आहे.

सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर कसं दिसतं? पाहा Inside Photos

दोन आरोपींना सोमवारी रात्री (१५ एप्रिल) रात्री उशिरा गुजरातमधील भुज इथून अटक करण्यात आली, असं अटकेची पुष्टी करताना मुंबई पोलिसांनी सांगितलं. गोळीबारानंतर मुंबईतून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुज येथून अटक करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी त्यांना मुंबईत आणलं जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गोळीबारानंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर सोडणार? मोठी माहिती आली समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान खानच्या घरावर पहाटे गोळीबार केल्यावर आरोपींना वापरलेली दुचाकी नंतर एक किलोमीटर अंतरावर एका चर्चजवळ सोडून दिली होती. दुचाकी सोडून दिल्यावर ते दोघे संशयित काही वेळ चालत गेले आणि मग त्यांनी रिक्षा घेतली आणि ते वांद्रे रेल्वे स्थानकावर पोहोचले, तिथून ते बोरीवलीला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चढले. दोघांनी जाता जाता कपडे बदलले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या घटनेतील दुचाकीच्या मालकाची चौकशी करण्यात आली होती, त्याने आपण दुचाकी काही दिवसांपूर्वी विकल्याचं सांगितलं होतं.