बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचा टीझर जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. टीझरनंतर चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या ट्रेलरबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अखेर ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान खानच्या अँक्शन सीन्सचा थरार पाहायला मिळत आहे. सलमान खान व पूजा हेगडेच्या केमिस्ट्रीची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. याबरोबरच भाईजानचा रोमँटिक अंदाजही पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सलमान खान दाक्षिणात्य लूकमध्ये पाहायला मिळत आहे. ‘किसी का भाई किसी की जान’च्या या धमाकेदार ट्रेलरला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे.

हेही वाचा>> ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी मागितली दिल्ली उच्च न्यायालयाची माफी, काय आहे प्रकरण?

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान खानसह दग्गुबती व्यंकटेश, पूजा हेगडे, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल यांचीही झलक पाहायला मिळत आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता जगपती बाबू नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. शहनाज गिल, जस्सी गिल आणि पलक तिवारी यांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा>> ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाचा सिक्वेल येणार का? नागराज मंजुळे म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. तर सलमान खान हा स्वत: या चित्रपटाची निर्मिती करत आहे. ईदच्या मुहुर्तावर येत्या २१ एप्रिलला ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.