Salman Khan : सौदी अरबच्या रियाधच्या जॉय फोरम २०२५ मध्ये सलमान खानने एक वक्तव्य केलं आहे. त्यानंतर त्याला प्रचंड ट्रोल केलं जातं आहे. सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सलमान खानचा जो व्हिडीओ आहे त्यात बलुचिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान असा उल्लेख सलमान खानने केला आहे. ज्यानंतर सलमानला अनेकजण ट्रोल करत आहेत. सलमान खानने बलुचिस्तान पाकिस्तानातून वेगळा केला असं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. भारतीय चित्रपटांची मध्य पूर्व देशांमध्ये आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये चांगली स्थिती आहे असं सलमान सांगत होता. त्यावेळी त्याने हे विधान केलं आहे.

सलमान खान काय म्हणाला?

सलमान खान म्हणाला, तुम्ही जर एखादा हिंदी चित्रपट बनवला आणि तुम्ही तो इथे प्रदर्शित केला (सौदी अरब) तर तो चित्रपट सुपरहिट असेल. तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा मल्याळी चित्रपट बनवला आणि प्रदर्शित केला तर तो देखील तो चित्रपटही कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करेल. कारण सौदी अरब मध्ये दुसऱ्या देशांतून आलेले अनेक लोक आहेत. अनेक जण बलुचिस्तान मधून आले आहेत, अफगाणिस्तानातून आले आहेत आणि पाकिस्तानातूनही आले आहेत. अनेक लोक इथे काम करत आहेत.

सलमान खान जे म्हणाला ती क्लिप व्हायरल

सलमान खाननी जे वक्तव्य केलं ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. आता यावर असा वाद रंगला आहे की सलमान खानने हे वक्तव्य जाणूनबुजून केलं की त्याने चुकून हे विधान केलं यावरुन वाद रंगला आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत?

सलमान खानचं काही लोकांनी कौतुक केलं आहे. तर काही लोकांनी तू मुद्दाम बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान असं म्हणालास? एका युजरने म्हटलं आहे. आणखी एका युजरने म्हटलं आहे की सलमान खानने एक राजकीय बॉम्ब टाकला आहे. बलुचिस्तानचा वेगळा उल्लेख करुन त्याला काय म्हणायचं आहे? तर काहींनी बलुचिस्तानचा वेगळा उल्लेख केल्याबद्दल सलमानचं कौतुक केलं आहे. बलुचिस्तानने संघर्ष केला आहे. त्यांची एक वेगळी राजकीय ओळख आहे असंही या युजरने म्हटलं आहे. सलमान खानने हे वक्तव्य जाणीवपूर्वक केलं की तो चुकून बोलून गेला हे माहीत नाही. पण त्याच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर मात्र वाद-प्रतिवाद आणि आरोपांच्या फैरी सुरु झाल्याचं दिसून आलं.