काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे बाबा सिद्दीकींनी काल, २४ मार्चला इफ्तार पार्टी दिली. दरवर्षी बाबा सिद्दीकी व त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी हे इफ्तार पार्टीचं आयोजन करतात. या पार्टीला बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळते. यंदाची ही इफ्तार पार्टी काल पार पडली. या पार्टीला सलमान खानसह प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, श्वेता तिवारी, पूजा हेगडे, शेहनाज गिल, मुनव्वर फारुकी, इमरान हाश्मी, ओरी असे अनेक कलाकार उपस्थित राहिले होते. याचे व्हिडीओ, फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच सलमान खानचा पुतणा म्हणजेच सोहेल खानचा मुलगा निर्वाणच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीला सलमान खान आपल्या कुटुंबियांसह पोहोचला होता. सलमानचे वडील सलीम खान देखील पाहायला मिळाले. पण निर्वाण खान एका कृतीमुळे सध्या चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: रितेश-जिनिलीयाच्या गाण्यावर डान्स अन्…, नारकर जोडप्याने ‘अशी’ साजरी केली धुळवड, पाहा व्हिडीओ

इफ्तार पार्टीमधील निर्वाण खानचा व्हिडीओ ‘इंस्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, सलमानचा पुतण्या अभिनेत्री पूजा हेगडेबरोबर पापाराझींना पोज देताना दिसत आहे. यावेळी निर्वाण पूजाला स्पर्श न करता फोटो काढताना पाहायला मिळत आहे. सलमान खान देखील अशातच प्रकारे अभिनेत्रींबरोबर फोटो काढत असतो. हाताची मूठ करून गळाभेट करत असतो. त्यामुळेच निर्वाण सलमान खानला फॉलो करत असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – Video: आला होळीचा सण लय भारी…, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील आदित्य-सईचा रितेश-जिनिलीयाच्या गाण्यावर जबरदस्त डान्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निर्वाण खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. निर्वाण व खान कुटुंबाचं कौतुक केलं जात आहे.