अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट दोन आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. चित्रपटात सलमान खानची दमदार एंट्री आणि फाइट सीन्स आहेत. शाहरुख आणि सलमान खान यांच्या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटात सलमान खान त्याच्या ‘टायगर’मधील भूमिकेत दिसला होता. आता चित्रपटाच्या यशावर आनंद व्यक्त करत त्याने ‘पठाण’बद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत सलमान खान ‘पठाण’ आणि शाहरुखबरोबर काम करण्याबद्दल म्हणाला, “मी आणि शाहरुख खान स्क्रीनवर एकत्र येण्यासाठी नेहमीच ‘पठाण’सारख्या एका खास चित्रपटाची गरज होती. या चित्रपटाने मला आनंद दिला. आम्ही दोघांनी एकत्र ‘करण-अर्जुन’ हा चित्रपट केला होता. जो खूप सुपरहिट ठरला होता आणि आता ‘पठाण’ही सुपरहिट ठरला.”

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

आणखी वाचा- स्मृती इराणींच्या मुलीचं नाव शाहरुख खानने ठेवलं? खुलासा करत म्हणाल्या…

सलमान खान म्हणाला, “मला माहीत आहे की प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर आम्हाला एकत्र पाहायला आवडतं. ‘पठाण’ला त्यांनी एवढं प्रेम दिलं त्याबद्दल मला आनंदच आहे.” याशिवाय आदित्य चोप्राबद्दल बोलताना सलमान म्हणाला, “आदिने मला सीक्वेन्स ऐकवला आणि शाहरुखबरोबर काम करण्याबद्दल सांगितलं तेव्हा मी खूप खुश झालो होतो. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांनी पाहावा हा त्याचा उद्देश होता.”

आणखी वाचा- प्रतीक्षा संपली! शाहरुख खानचा ‘पठाण’ ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

सलमान पुढे म्हणाला, “आदित्य प्रेक्षकांना काहीतरी खास देऊ इच्छित होता. जे त्यांना पाहायला आवडेल. तो मला आणि शाहरुखला खूप जवळून ओळखतो. त्यामुळेच तो आमची व्यक्तिमत्व स्क्रीनवर दाखवण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे आज प्रेक्षकांची आम्हाला पसंती मिळताना दिसत आहे. याशिवाय दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदनेही आमचे सीन अप्रतिम पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडले. ‘पठाण’ला एवढं यश आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय हे पाहून आनंद होतोय. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे कारण करोनानंतर सर्वाधिक प्रेक्षक पहिल्यांदाच चित्रपटगृहात आले.”