scorecardresearch

प्रतीक्षा संपली! शाहरुख खानचा ‘पठाण’ ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

Pathaan: ‘पठाण’ ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

pathaan ott release
'पठाण' ओटीटीवर 'या' दिवशी होणार प्रदर्शित. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बहुचर्चित ‘पठाण’ हा बॉलिवूड चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. बॉलिवूड किंग शाहरुख खानने तब्बल चार वर्षांच्या ब्रेकनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे बॉयकॉट ट्रेण्डमध्ये अडकलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ५७ कोटींची कमाई केली. अजूनही ‘पठाण’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदोड सुरुच आहे.

तिसऱ्या आठवड्यातही शाहरुख खानच्या ‘पठाण’ची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. ‘पठाण’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करत आहेत. अशातच आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आली आहे. बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणर आहे.

हेही वाचा>> Video: सिद्धार्थ-कियाराचा बॉलिवूड गाण्यांवर डान्स; पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> बीएमडब्ल्यू गाडी, घरासाठी पैसे अन्…; सुकेश चंद्रशेखरकडून नोरा फतेहीने घेतलेले महागडे गिफ्ट

यशराज फिल्म्सची निर्मिती असलेला ‘पठाण’ चित्रपट अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, २५ एप्रिलला ‘पठाण’ ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पठाण प्रेक्षकांना ओटीटीवरही पाहता येणार आहे.

हेही वाचा>> भारताच्या नकाशावर पाय दिल्याने अक्षय कुमार ट्रोल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

‘पठाण’ हिंदीसह तमिळ, तेलुगू भाषेमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे. परदेशातही ‘पठाण’ चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने १२ दिवसांत देशांतर्गत ५०० कोटींचा गल्ला जमवला आहे. तर वर्ल्ड वाइड या चित्रपटाने ८०० कोटींची कमाई केली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 14:44 IST