अभिनेता सलमान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. सलमान त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याला लहान मुले फार आवडतात. त्याला वडील व्हायचे होते पण ते शक्य झाले नाही, असा खुलासा त्याने नुकताच एका कार्यक्रमामध्ये केला.

सलमान खानने नुकतीच रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या वेळी त्याला त्याच्या कामाबद्दल, त्याच्या खासगी आयुष्याबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले. सलमानने नेहमीच्या शैलीत मोकळेपणाने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यातील एका प्रश्नाचे उत्तर देताना वडील होण्याची इच्छा काही वर्षांपूर्वी त्याच्या मनात होती असे त्याने सांगितले.

आणखी वाचा : सलमान खान लग्नासाठी तयार? म्हणाला, “आता घरूनही दबाव येतोय आणि…”

लग्नाबद्दलच्या मतांबाबत चर्चा करताना त्यांच्या संभाषणात करण जोहरचा उल्लेख झाला. रजत शर्मा म्हणाले की, “करण जोहरला तू हाच प्रश्न विचारला होतास की त्याने लग्न का नाही केले, आज तो दोन मुलांचा बाप आहे.” त्यावर सलमान म्हणाला, “मीदेखील तोच प्रयत्न करीत होतो पण कायद्यामध्ये काही बदल झाले. मला लहान मुले फार आवडतात. पण मुले येतात तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची आईही येते. त्या मुलांसाठी आई नेहमीच चांगली असते पण आमच्या घरी खूप आई आहेत. त्या सर्व मुलांची खूप चांगली काळजी घेतील. पण मुलांच्या बरोबरीने आयुष्यात येणारी त्यांची आई… याचा विचार करणे कठीण आहे.”

हेही वाचा : सलमान खानबरोबर स्क्रीन शेअर? अजिबात नको…या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी नाकारले त्याचे चित्रपट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान खानचे हे उत्तर खूप चर्चेत आले आहे. त्यामुळे आता करण जोहरसारखाच सिंगल पॅरेंट व्हायचा विचार सलमानच्याही मनात होता याचा खुलासा झाला आहे.