scorecardresearch

Premium

“ममता बॅनर्जींचे घर माझ्या घरापेक्षाही लहान”, सलमान खानचा खुलासा; म्हणाला, “मला हेवा वाटतोय की…”

“दीदींच्या घरून परत येताना मला…”, ममता बॅनर्जींच्या घरी भेट दिल्यावर सलमान खानने केलेले विधान चर्चेत

Salman Khan reveals Mamata Banerjee house is smaller than his flat
सलमान खान ममता बॅनर्जींबद्दल काय म्हणाला? जाणून घ्या

२९ व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (KIFF) मंगळवारी कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये सुरुवात झाली. या फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अभिनेता सलमान खान, अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी सिन्हा, सौरव गांगुली आणि महेश भट्ट हे उपस्थित होते. आपल्या भाषणादरम्यान सलमानने ममता बॅनर्जींच्या निवासस्थानाची तुलना त्याच्या मुंबईतील घराशी केली. तसेच त्याला ममता यांच्या लहान घराचा हेवा वाटला असंही सांगितलं.

उद्घाटन समारंभात बोलताना सलमान म्हणाला, “जेव्हा मला दीदींनी त्यांच्या घरी बोलावलं होतं, तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता. ‘मला बघायचं आहे की त्यांचं घर खरंच इतकं छोटं आहे का?’ त्यांचं घर माझ्या घरापेक्षा लहान आहे की नाही? एके दिवशी अनिल कपूर यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं होतं. ते म्हणाले, ‘चला पहिल्या मजल्यावर जाऊ या.’ पण वरती अजून चार मजले होते. मला वाटतं आता ते अजूनच मोठं झालंय. मग मी त्यांना विचारलं होतं की त्यांनी मला हेवा वाटावा म्हणून फोन करून घरी बोलावलं होतं का? आता ममता दीदींच्या घरून परत येताना मला हेवा वाटू लागला की त्यांचं घर खरंच माझ्या घरापेक्षा लहान आहे.”

ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”
Womens Health why facial hair growth increase and What is the solution on it
स्त्री आरोग्य : तुमच्या चेहऱ्यावर आहेत त्रासदायक केस?
Samorchya bakavarun economics Budget NDA Government Budget discussions
समोरच्या बाकावरून: मनोरंजन करणारे अर्थमंत्र्यांचे दावे..
Uddhav thackeray in dharavi
“…तर जनतेला त्यांच्या पेकाटात लाथ घालावीच लागेल”, धारावीतून उद्धव ठाकरेंचा पुन्हा एल्गार

“आमची रोज भांडणं होतात”, ऐश्वर्या रायने केलेला खुलासा; अभिषेक बच्चन म्हणालेला, “आयुष्य खूप…”

सलमान पुढे म्हणाला, “जेव्हा शत्रु साहेब (शत्रुघ्न सिन्हा) माझ्या घरी येतात तेव्हा त्यांना बसायला जागा मिळत नाही ही एक मोठी अडचण असते. माझ्याकडे एक रूम, एक लहान स्वयंपाकघर आणि एक बेडरूम आहे. तेवढं खूप गरजेचं आहे कारण आपण उभे राहून झोपू शकत नाही. मला हेवा वाटतोय की एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीचं (ममता बॅनर्जी) घर माझ्या घरापेक्षा लहान घर कसं असू शकतं? खरं तर यावरून हेच दिसून येतंय की लोक किती साधे आहेत आणि आपल्याला जीवन जगण्यासाठी फार गोष्टींची गरज नाही.”

“मी मागच्या २५ ते २६ वर्षांपासून रात्री…”, सलमान खानचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

salman khan mamta banerjee
सलमान खानने शेअर केलेला ममता बॅनर्जींबरोबरचा फोटो

यावेळी अनिल कपूर यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या. “माझ्यासाठी कोलकाता हे फक्त एक शहर नाही, तर एक अनुभव आहे. हे शहर प्रवास आणि आठवणींचा खजिना आहे ज्याने माझ्या करिअरला आकार दिला आणि माझे सिनेमाबद्दलचे प्रेम वाढवले,” असं अनिल कपूर म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan reveals west bengal cm mamata banerjee house is smaller than his flat hrc

First published on: 06-12-2023 at 10:36 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×