माधुरी दीक्षित, शिल्पा शिरोडकर, नम्रता शिरोडकर अशा अनेक मराठी अभिनेत्रींनी एकेकाळी बॉलीवूड गाजवलं. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीला एका गाण्यामुळे बॉलीवूडमध्ये खूप लोकप्रियता मिळाली. एका गाण्यामुळे स्टार झालेल्या या अभिनेत्रीने आपल्या सौंदर्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. पण तिचं करिअर फार चांगलं राहिलं नाही. वैयक्तिक आयुष्यातही तिला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला.

पंकज उधास यांचं ‘चुपके चुपके सखियों से वो’ हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. या गाण्यात जॉन अब्राहमबरोबर झळकलेल्या अभिनेत्रीचं नाव राजलक्ष्मी खानविलकर. या गाण्यामुळे मराठमोळी राजलक्ष्मी खानविलकर व जॉन अब्राहम दोघांनाही खूप प्रसिद्धी मिळाली.

‘परिचय’ राजलक्ष्मीच्या सौंदर्याने तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या म्युझिक व्हिडीओतून लोकप्रियता मिळाल्यावरही राजलक्ष्मीला बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करता आलं नाही. राजलक्ष्मी तिच्या चित्रपट करिअरपेक्षा व अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. १९९६ मध्ये ‘कॅडबरी’ च्या जाहिरातीदरम्यान तिची भेट मॉडेल व अभिनेता समीर सोनीशी भेट झाली. नंतर त्यांची मैत्री झाली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि दोघांनी तीन महिन्यांच्या ओळखीनंतर लग्नगाठ बांधली. पण दुर्दैवाने त्यांचं लग्न फक्त सहा महिने टिकलं आणि त्यांचा घटस्फोट झाला.

समीर सोनी घटस्फोटाबद्दल काय म्हणाला होता?

एका मुलाखतीत समीर सोनीने त्याच्या व राजलक्ष्मीच्या घटस्फोटाबाबत सांगितलं होतं. ज्या रात्री पहिल्या चित्रपटाचं प्रिमियर होतं, त्याच रात्री आपला घटस्फोट झाला होता, असा खुलासा त्याने केला होता. “ती रात्र मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. माझ्यासाठी ती खूप त्रासदायक रात्र होती. माझ्या वैयक्तिक जीवनात वादळ आलं होतं. खरं तर मला घटस्फोट घ्यायचा नव्हता. कारण आमच्या लग्नाला फक्त सहा महिने झाले होते, त्यामुळे नात्याला वेळ द्यावा असं मला वाटत होतं,” असं समीर म्हणाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समीर सोनीने नंतर अभिनेत्री नीलम कोठारीशी दुसरं लग्न केलं. त्यांना अहाना नावाची एक मुलगी आहे. समीर सोनीपासून घटस्फोट झाल्यानंतर राजलक्ष्मीने २००० साली ‘आशिकी’ फेम राहुल रॉयशी लग्न केलं. पण दोघांचा १४ वर्षांच्या संसारानंतर २०१४ मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर राजलक्ष्मी खानविलकर आता कुठे आहे आणि ती काय करत आहे याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.