रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ‘अ‍ॅनिमल’चं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ८०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात रणबीरच्या बरोबरीनेचे बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.

याबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हेदेखील सध्या चांगलेच चर्चेत आहेत. चित्रपटावर टीका करणाऱ्या टीकाकारांना संदीप यांनी चोख उत्तर दिलं आहे. बऱ्याच मोठमोठ्या सेलिब्रिटीजनाही संदीप यांनी उत्तर दिलं आहे. सध्या संदीप त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. नुकतंच त्यांनी त्यांच्या पत्नीची व ७ वर्षाच्या मुलाची या चित्रपटावर नेमकी काय प्रतिक्रिया होती ते स्पष्ट केलं आहे.

संदीप यांच्या पत्नीला या चित्रपटात काहीच आक्षेपहार्य वाटलं नसल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. शिवाय आपल्या मुलालादेखील चित्रपटातील कोणता प्रसंग अधिक आवडला याबद्दलही खुलासा केला आहे. संदीप यांनी आपल्या मुलाचं नाव अर्जुन रेड्डी ठेवलं आहे, २०१७ साली त्यांचा या नावाचा चित्रपत्र गाजला होता अन् त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलाचे नाव त्या चित्रपटावर ठेवले.

आणखी वाचा : बॉबी देओलच्या चाहत्यांसाठी खुशखबर, अब्रार हकवर येणार स्वतंत्र चित्रपट; ‘अ‍ॅनिमल’च्या मार्केटिंग हेडचा मोठा खुलासा

संदीप म्हणाले, “माझ्या पत्नीने पूर्ण चित्रपट पाहिला, तिला फक्त चित्रपटातील रक्तपात फारसा पसंत पडला नाही, पण इतर कोणत्याही गोष्टी तिला आक्षेपहार्य वाटल्या नाहीत, खासकरून ज्यावरून आत्ता गदारोळ सुरू आहे.” पुढे आपल्या सात वर्षांच्या मुलाला चित्रपट दाखवण्याबद्दल संदीप म्हणाले, “मुलांनी जे सीन्स पहायचे नाहीत ते सगळे मी काढून टाकले अन् आम्ही नवीन एडिटेड चित्रपट मुलाला दाखवला. मी त्यातले सगळे ए-रेटेड सीन्स कट केले होते. त्याला चित्रपट आवडला, खासकरून अंडरवेअर वाला अॅक्शन सीन त्याला फार मजेशीर वाटल्याचं त्याने मला सांगितलं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच मुलाखतीमध्ये संदीप यांनी त्यांचा भाऊ व पत्नी दोघेही हे उत्तम समीक्षक आहेत अन् त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया या सच्च्या असतात असंही स्पष्ट केलं. ‘अ‍ॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर ९०० कोटींहून अधिक कमाई केली. आता लोक संदीप यांच्या ‘अ‍ॅनिमल पार्क’ची आतुरतेने वाट बघत आहेत. नुकताच हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे ज्यामुळे सोशल मीडियावर या विषयावर पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.