‘मुन्ना भाई एमबीबीएस’ व ‘लगे रहो मुन्ना भाई’ या चित्रपटातील मुन्ना व सर्किटच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. त्यामुळे गेल्या बऱ्याच वर्षांपासून या चित्रपटाचे चाहते मुन्ना-सर्किटला पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मध्यंतरी ‘मुन्ना भाई चले अमेरिका’ अशा टायटलचा एक प्रोमो आला होता. पण त्यानंतर पुढे याबाबत कोणतीही माहिती आली नाही. आता मुन्ना-सर्किटची ही जोडी पुन्हा भेटल्यामुळे ‘मुन्ना भाई ३’ चित्रपटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिनेता संजय दत्त व अर्शद वारसी ‘मुन्ना भाई ३’ चित्रपटासाठी एकत्र भेटल्याचं बोललं जात आहे.

व्हायरल फोटोमध्ये संजय दत्त अर्शद वारसीच्या खांद्यावर हात टाकून बसला आहे. याच फोटोनं ‘मुन्ना भाई एमबीबीएस’च्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. पण हे दोघं ‘मुन्ना भाई ३’ चित्रपटासाठी नाहीतर एका जाहिरातीच्या शूट निमित्तानं भेटले होते.

हेही वाचा – काजोलची छोट्या पडद्यावर एंट्री; ‘या’ लोकप्रिय मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

अलीकडेच झालेल्या ‘इंडिया टुडे’च्या मुलाखतीत अर्शद वारसीनं ‘मुन्ना भाई ३’ या चित्रपटाबद्दल काही गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला की,” ‘मुन्ना भाई ३’ चित्रपट होणं शक्य वाटतं नाही. आमच्याकडे दिग्दर्शक आहे, ज्याला हा चित्रपट दिग्दर्शित करायचा आहे. निर्माता आहे, ज्याला या चित्रपटाची निर्मिती करायची आहे. प्रेक्षकवर्ग, ज्यांना हा चित्रपट पाहायचा आहे. कलाकार आहेत, ज्यांना या चित्रपटात भूमिका करायची आहे. आणि तरीही होऊ शकत नाही, हे खूप विचित्र आहे.”

हेही वाचा – ‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम अभिनेत्री कास्टिंग काऊचची झाली होती शिकार; खुलासा करत म्हणाली, “मला…”

हा चित्रपट पुढे का ढकलला जात आहे याबाबत अर्शद म्हणाला की, “पहिल्या दोन चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर प्रेक्षकांना ‘मुन्ना भाई ३’ चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे त्या अपेक्षा लक्षात घेऊनच दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना तशाप्रकारचा चित्रपट करायचा आहे. या कारणांमुळे हा चित्रपट करण्यासाठी जास्त वेळ घेतला जात आहे.”

हेही वाचा – मुलाचं नाव मुस्लिम ठेवलं अन्…; अभिनेत्रीला डिलीट करावा लागला ‘तो’ व्लॉग, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राजकुमार हिराणी यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे असतात. त्यांच्याकडे आता ३ चांगल्या स्क्रिप्ट आहेत. पण, त्यातही थोड्याफार त्रुटी आहेत. त्यामुळे जोपर्यंत राजू यांना या स्क्रिप्टबद्दल १०० ते २०० टक्के खात्री होतं नाही, तोपर्यंत ते काम चालू करणार नाहीत. जर तुम्ही त्यांना विचारलं तर ते होच म्हणतील. कारण कधीच ते कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाहीतं. तसेच ते असंही सांगतील, ‘मी त्यावर काम करतोय, एकदाची स्क्रिप्ट नक्की होऊ दे. मला या स्क्रिप्टमधलं हे आवडतं नाही, मला त्या स्क्रिप्टमधलं ते आवडतं नाही.’ त्यांनी फक्त हा टप्पा पार करायला हवा, मग ते या चित्रपटाला नक्की सुरुवात करतील,” असं अर्शद स्पष्टच सांगितलं.