This Actor Was Banned By Bollywood Celebrating his 66th Birthday Today : प्रत्येक कलाकाराच्या कारकिर्दीचा प्रवास वेगळा असतो. काहींना पटकन यश मिळतं, तर काहींना त्यासाठी बऱ्याच खस्ता खाव्या लगातात. यश मिळालं तरी ते टिकवणं खरं आव्हान असल्याचं अनेक जण सांगताना दिसतात. असाच काहीसा प्रवास एका लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्याचा आहे, ज्याच्या खासगी आणि व्यवसायिक आयुष्यामध्ये आजवर अनेक गोष्टी घडल्या आहेत.
बॉलीवूडमध्ये संजू बाबा या नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे संजय दत्त. संजय दत्तला त्याच्या घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्याचे वडील सुनील दत्त व आई नर्गिस दत्त हे प्रसिद्ध कलाकार होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत संजय दत्तनेही या क्षेत्रात पदार्पण केले; परंतु या क्षेत्रातील त्याचा प्रवास सोपा नव्हता. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त याबद्दल जाणून घेऊयात.
संजय दत्तनं ‘रॉकी’ या १९८१ रोजी आलेल्या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. परंतु, १९८६ रोजी आलेल्या ‘नाम’ चित्रपटामुळे तो प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर मात्र त्याचे सलग १३ चित्रपट फ्लॉप ठरले. त्यानंतर आला ‘खलनायक’ हा चित्रपट. त्यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री माधुरी दीक्षित व जॅकी श्रॉफ होते. या चित्रपटामुळे त्याची अभिनय कारकीर्द पुन्हा मार्गावर आली. हा चित्रपट त्या वर्षातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.
संजय दत्तला झालेली अटक
चित्रपट चांगला चालल्यानंतर त्याला इतर चित्रपटांसाठी विचारणा होत होती. परंतु, त्यावेळी व्यवसायिक व खासगी आयुष्यामध्ये त्याला काही संकटांना सामोरं जावं लागलं. संजय दत्तच्या कारकिर्दीत असा एक काळ होता, जिथे त्याला बॉलीवूडनं बॅन केलं होतं. एवढंच नाही, तर १९९३ मध्ये अभिनेत्याला तुरुंगात जावं लागलेलं. त्यावेळी संजय दत्तकडे एके-५६ ही बंदी असलेली रायफल सापडल्यानं त्याला अटक झाली होती.
संजय दत्तचं बॉलीवूडमध्ये पुनरागम
अटक झाल्यानंतर संजय दत्तची नंतर तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर तो इंडस्ट्रीत परतण्याचं नियोजन करत असताना २०२० साली त्याला कर्करोगाचं निदान झालं. त्यावेळी तो कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यावर होता. मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेव्हा त्याने ‘केजीएफ २’ या कानडी चित्रपटाची ऑफर स्वीकारली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. त्यामुळे संजय दत्तनं त्याच्या कामातून त्याच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं. २०२३ मध्ये त्यानं अजून एका चित्रपटात काम केलं होतं. तर ‘लिओ’ या तमीळ चित्रपटात त्यानं खलनायकाची भूमिका साकारलेली. ‘Times Now’ च्या वृत्तानुसार या चित्रपटानं जवळपास ३०० कोटींची कमाई केली.
दरम्यान, संजय दत्तच्या खासगी आयुष्यातही फार काही नीट सुरू नव्हतं. त्याचं पहिलं लग्न १९८७ मध्ये रिचा शर्मासह झालं होतं. परंतु, दुर्दैवानं त्यांचं कर्करोगामुळे निधन झालं. रिचा शर्मा व संजय दत्त या दाम्पत्यानं एका मुलीला जन्म दिला. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यानें रिया पिल्लाईसह लग्न केलं. परंतु, असं म्हटलं जातं की, तिनं त्याची फसवणूक केली होती. दुसरी पत्नी रियासह घटस्फोट घेतल्यानंतर त्यानं मान्यतासह लग्न केलं. या दोघांना एक मुलगी व मुलगा आहे.