शाहरुख खान हा त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याला चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी फार उत्सुक आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या ट्रेलर नाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. प्रदर्शनानंतर काही तासातच या ट्रेलरने यू ट्यूबवर काही मिलियन व्हूज मिळवले.

या चित्रपटातील गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादावर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. नुकतंच संजय राऊत यांनीदेखील या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘एबीपी न्यूज’च्या प्रेस कॉन्फरन्स या कार्यक्रमात संजय राऊत यांनी हजेरी लावली. यादरम्यान संवाद साधताना संजय राऊत यांनी शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादावर भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : ‘कांतारा’फेम अभिनेत्री सप्तमी गौडा करणार हिंदीमध्ये पदार्पण; विवेक अग्निहोत्री यांनी दिलाय मोठा ब्रेक

ते म्हणाले, “पठाण या चित्रपटावरून जेवढा वाद झाला आहे तेवढा वाद निर्माण करायची काही गरज नव्हती. देशात आणखी बरेच मोठे प्रश्न आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता यावं म्हणून या विषयावर चर्चा होत आहे. जे भाजपाबरोबर जोडले गेले आहेत त्यांनीही अशा रंगाचे कपडे परिधान केले होते. सेन्सॉर बोर्ड ही सरकारच्या हातातील बाहुली झाली आहे. तो शाहरुख खानचा चित्रपट आहे म्हणून त्यातील सीन हटवण्यात आला. मोठ्या पडद्यावर नंगानाच होत असेल आणि मग त्याला कुणी विरोध करत असेल तर समजू शकतो, पण केवळ त्या कपड्याचा रंग भगवा आहे म्हणून त्यावर जर कुणी आक्षेप घेणार असेल तर ते चूक आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून शाहरुख चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत आहे, तर जॉन अब्राहम या चित्रपटात नकारात्मक भूमिका सकारत आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे या चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत.