अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या ‘कटहल’ चित्रपटामुळे चर्चेत असून, तिचा हा चित्रपट १९ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२३ हे वर्ष सान्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून तिचे ‘कटहल’, ‘जवान’, ‘सॅम बहादूर’सारखे चांगले चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. ‘जवान’ चित्रपटात सान्या बॉलीवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे सान्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले.

हेही वाचा : लग्नाबद्दल सारा अली खानने दिलेला ‘तो’ सल्ला चर्चेत, म्हणाली “विकी कौशल माझा चौथा सहकलाकार ज्याने…”

अभिनेत्री सान्या मल्होत्राने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानबरोबर ‘जवान’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता याबाबत खुलासा केला आहे. सान्या म्हणाली, “जवान चित्रपटातील माझ्या भूमिकेसाठीचं शूटिंग गेल्या वर्षी पूर्ण झाले. शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, दिग्दर्शक अ‍ॅटली यांसारख्या मोठ्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली.”

सान्याने पुढे सांगितले, “आता ‘जवान’बाबत अधिकृत घोषणा झाल्याने मी मोकळेपणाने चित्रपटाबद्दल बोलू शकते, कारण यापूर्वी तू ‘जवान’मध्ये आहेस का? असा प्रश्न विचारल्यावर मी उत्तर देण्यास टाळाटाळ करत होते. आयुष्यात एकदा तरी शाहरुखबरोबर काम करायला मिळावे अशी माझी इच्छा होती. म्हणूनच ‘जवान’मध्ये काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी स्वप्नवत होता. मी म्हणेन, हा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी ‘ड्रीम रोल’ आणि ड्रीम चित्रपटात काम करण्यासारखा आहे.”

हेही वाचा : ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटात काम करण्यास ऐश्वर्या रायने दिला होता नकार, कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सान्याकडे सध्या प्रभावी चित्रपटांची रांग लागली आहे. हर्मन बावेजा, मेघना गुलजार, विकी कौशल यांच्यासोबत ती काही आगामी प्रोजेक्ट्सवर काम करीत आहे. सान्याने आयुष्मान खुरानासोबत काम केलेल्या ‘बधाई हो’ चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.