अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच तिच्या दिलखुलास अंदाजामुळे चर्चेत असते. अनेकदा ती उत्स्फूर्तपणे व्यक्त होताना दिसते. तिच्या याच दिलखुला स्वभावामुळे सर्वांचंच लक्ष तिच्याकडे वेधलं जातं. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. तर आता नुकतेच साराने तिचे लग्नाचे प्लॅन्स सांगितले आहेत. तर याचबरोबर तिला नवरा कसा हवा आहे हे तिने सांगितलं.
सारा आली खान सध्या तिच्या ‘गॅसलाईट’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. ३१ मार्च रोजी ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर हा चित्रपट प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस त्या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यग्र होती. या दरम्यान तिने अनेक मुलाखती दिल्या. तर आता नुकताच अभिनेत्री शहनाज गिलच्या ‘देसी वाइब्स विथ शहनाज गिल’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने शेहनाजशी भरपूर गप्पा मारल्या.
आणखी वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत बोलू लागली, व्हिडीओ व्हायरल
या कार्यक्रमामध्ये शहनाजने साराला “तुझ्या लग्नाचे प्लॅनिंग काय आहेत?” असा प्रश्न विचारला. याचं उत्तर देत सारा गमतीत म्हणाली, “मी अजुन त्याचा काही विचार केलेला नाही. पण मला असा एखादा आंधळा नाहीतर वेडा माणूस नवरा म्हणून शोधावा लागेल. कारण म्हणजे तो जर फार हुशार असला तर तो मला सोडून जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण लग्नानंतर त्याला मी खरी कशी आहे हे कळेल.” तिचा हा विनोदी अंदाज आता खूप चर्चेत आला आहे. तर याच बरोबर “मला निश्चितच लग्न करायचं आहे पण इतक्यात लग्नाचा माझा विचार नाही” असंही तिने सांगितलं.
हेही वाचा : आलिशान गाड्यांना डावलून सारा अली खानने केला ऑल्टो गाडीतून प्रवास, कारण ऐकून व्हाल थक्क
दरम्यान साराच्या ‘गॅसलाईट’ या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेत्री चित्रांगदा सिंह, विक्रांत मेस्सी यांच्या मुख्य भूमिका आहेत.