ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचं गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. अचानक घडलेल्या या घटनेने सतीश कौशिक यांच्या कुटुंबीयांसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे. त्यांच्यावर गुरुवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला सलमान खानसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

Video : ४५ वर्षांची मैत्री तुटली! सतीश कौशिक यांच्या पार्थिवाजवळ बसून ढसाढसा रडले अनुपम खेर, व्हिडीओ व्हायरल

सतीश कौशिक यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनुपम खेर, जावेद अख्तर, इला अरुण, अन्नू कपूर, रणबीर कपूर, रझा मुराद आणि बोनी कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी पोहोचले.

सलमान खानही सतीश कौशिक यांच्या घरी पोहोचला होता. सलमानलाही सतीश कौशिक यांच्या निधनाचा धक्का बसला आहे. त्याने पोस्ट शेअर करत सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली. सतीश कौशिक सलमान खानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये दिसणार आहेत.

‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन कौशिक यांच्या अंतिम संस्काराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत शोक व्यक्त केला आहे. तसेच सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतीश कौशिक यांच्यामागे त्यांची पत्नी व १० वर्षांची मुलगी असा परिवार आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, बॉलिवूडमध्येही त्यांचे अनेक मित्र होते. त्यांचे ते मित्र आज त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले होते.