Satish Kaushik Passed Away: बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कौशिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती. कौशिक यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर त्यांचं पार्थिव मुंबईतील वर्सोवा येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. कौशिक यांना शेवटचा निरोप देण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

हेही वाचा>> सतीश कौशिक यांनी गरोदर नीना गुप्तांना लग्नाची मागणी घातल्यानंतर ‘अशी’ होती त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया, स्वतःच केलेला खुलासा

इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन कौशिक यांच्या अंतिम दर्शनाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत शोक व्यक्त केला आहे. सतीश कौशिक यांच्यामागे त्यांची पत्नी व १० वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

हेही पाहा >> Satish Kaushik Passed Away: पत्नी आणि १० वर्षांच्या मुलीसाठी किती संपत्ती सोडून गेले सतीश कौशिक?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’सह या चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. कंगना रणौतचा ‘एमर्जन्सी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी जगजीवन राम यांची भूमिका साकारली आहे.