सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पण सतीश यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं? याबाबत पोलीस तपास करत आहेत. सतीश यांनी दिल्लीमधील बिजवासन येथील व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्महाऊसवर होळी पार्टी केली. या पार्टीनंतरच सतीश यांची प्रकृती बिघडली. यादरम्यान विकासची पत्नी सान्वी मालू पतीवर गंभीर आरोप करत आहे.

आणखी वाचा – “१५ कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली” पत्नीच्या आरोपावर व्यावसायिकाचं उत्तर, म्हणाला, “होळी पार्टीच्या…”

सतीश यांची हत्या विकासने केली असल्याचा आरोप सान्वी सातत्याने करत आहे. विकासने काही वर्षांपूर्वी सतीश यांच्याकडून १५ कोटी रुपये घेतले होते. त्याच्याकडे १५ कोटी रुपये परत करण्यासाठी पैसेच नव्हते आणि या वादामधूनच विकासने सतीश यांची हत्या केली असल्याचं सान्वी म्हणत आहे.

आणखी वाचा – Video : सतीश कौशिक यांच्या निधनानंतर कोलकाताच्या कालीघाट मंदिरामध्ये पोहोचले अनुपम खेर, म्हणाले, “माझ्या मित्राच्या…”

आता या सगळ्या प्रकरणावर सतीश यांच्या पत्नी शशी कौशिक यांनी मौन सोडलं आहे. ‘एबीपी न्यूज’शी संवाद साधताना शशी म्हणाल्या, “पोलिसांनी संपूर्ण तपास केला आहे. यानंतरही सतीश यांची हत्या करण्यात आली असं ती (सान्वी मालू) का बोलत आहे? हे कळत नाही. पोलिसांनीही या प्रकरणामध्ये तपास करावा असंही मला वाटत नाही. कारण जे काही घडलं ते सगळं समोर आहे”.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध रॅपरचं २७व्या वर्षी निधन, गाणं गात असतानाच स्टेजवर कोसळला अन्…; ‘तो’ व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांमध्ये येईल पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्या म्हणाल्या, “सतीश यांच्या निधनानंतरही अशा गोष्टींची चर्चा होत आहे हे खूप चुकीचं आहे. तिला तिच्या पतीकडून पैसे हवे आहेत. म्हणून सतीश यांना ती यामध्ये सहभागी करुन घेत आहे. मी तिला विनंती करते की, कृपया असं काही करू नको. जर सतीश यांनी १५ कोटी रुपयांची उलाढाल केली असती तर त्यांनी मला तसं सांगितलं असतं. मला या प्रकरणाबाबत आणखी काही बोलायचं नाही. याची पोलीस चौकशी व्हावी अशीही माझी इच्छा नाही”. शशी कौशिक यांनी संपूर्ण आरोप फेटाळले आहेत.