बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या ऑनस्क्रीन क्रेमिस्ट्रीने ‘भूल भुलैय्या २’ या चित्रपटाच्या माध्यामातून प्रेक्षकांचे मन जिंकले होते. यानंतर पुन्हा एकदा ही जोडी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांनीही चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला होता. आता टीझरनंतर चित्रपटाचे पहिले गाणे ‘नसीब से’ रिलीज करण्यात आले आहे.

हेही वाचा : “पोस्टरखाली सत्यघटनेवर आधारित लिहून…” ‘द केरला स्टोरी’बाबत कमल हासन यांचे स्पष्ट मत, म्हणाले…

शनिवारी २७ मे रोजी ‘सत्यप्रेम की कथा’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले गाणे ‘नसीब से’ रिलीज केले आहे. पायल देवने हे गाणे संगीतबद्ध केले असून विशाल मिश्रा आणि पायल यांनी मिळून हे गाणे गायले आहे. या गाण्याचे लेखन ए.एम.तुराज यांनी केले आहे. सध्या सोशल मीडियावर कार्तिक-कियाराचे चाहते या गाण्याचे कौतुक करत आहेत. अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘नसीब से’ हे गाणे शेअर करीत कॅप्शनमध्ये ‘अधुरा था मैं, अब पुरा हुआ, जबसे तू मेरा हो गया’ असे लिहिले आहे.

हेही वाचा : “पोस्टरखाली सत्यघटनेवर आधारित लिहून…” ‘द केरला स्टोरी’बाबत कमल हासन यांचे स्पष्ट मत, म्हणाले…

कार्तिक आणि कियारा यांच्यातील सुंदर केमिस्ट्री आणि काश्मीरमधील नयनरम्य जागा यामुळे या गाण्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहेत. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यावर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया देत कार्तिक-कियाराला त्यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘जानकी’च्या भूमिकेबद्दल अभिनेत्री क्रिती सेनॉन म्हणाली, “कारकिर्दीत सहसा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट या वर्षी २९ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‘सत्यनारायण की कथा’ असे होते, पण चित्रपटाच्या नावावरून सुरु असलेल्या वादामुळे यात बदल करून ‘सत्यप्रेम की कथा’ असे नाव ठेवण्यात आले. कार्तिक-कियारासह या चित्रपटात गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.