‘पठाण’, ‘जवान’ या चित्रपटांनी केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईनंतर शाहरुख खान पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. जानेवारीत प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ने आणि त्यापाठोपाठ सप्टेंबरमध्ये आलेल्या ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण तब्बल २ हजार कोटींचा गल्ला जमावला आहे. आता यामध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे तो म्हणजे राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’.

हेही वाचा : आधी ‘हे’ होतं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं नाव, दिग्दर्शकांनी सांगितलं नाव बदलण्याचं कारण

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त ‘डंकी’ चित्रपटाचा टीझर गुरूवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या टीझरला चित्रपट समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. चित्रपटामध्ये शाहरुखचा वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. किंग खानबरोबर ‘डंकी’मध्ये अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विकी कौशलची झलक पाहायला मिळत आहे. याशिवाय ‘डंकी’च्या टीझरमध्ये एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. टीझरमध्ये काही सेकंदासाठी त्यांची झलक दिसते. या अभिनेत्री कोण आहेत माहितीये का?

हेही वाचा : तोकड्या कपड्यांमुळे उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

शाहरुखच्या ‘डंकी’मध्ये अमृता सुभाषची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष या लहानशी पण, लक्षवेधी भूमिका साकारणार आहेत. टीझरमध्ये शाहरुखच्या मित्राची आई त्याला आजीची शपथ घ्यायला सांगते. यावर ज्योती सुभाष अरे…सगळे माझी शपथ का घेता? आणि पुढे खोटी शपथ घेतल्याने त्यांचं निधन झालेलं दिसतं. हा संपूर्ण सीन टीझरमध्ये कॉमेडी स्वरुपात दाखवण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्योती सुभाष मराठी कलाविश्वात सक्रिय आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.

हेही वाचा : Sonali Kulkarni Birthday: सोनाली कुलकर्णीला पहिला सिनेमा कसा मिळाला? वाचा माहीत नसलेला किस्सा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
dunki movie marathi actress
‘डंकी’ चित्रपटात ज्योती सुभाष यांची भूमिका

‘डंकी’ हा चित्रपटाची कथा अवैध स्थलांतरावर आधारित आहे. यापूर्वी राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’, ‘पीके’, ‘३ इडियट्स’ या सगळ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्यामुळे ‘डंकी’ चित्रपटाकडून शाहरुखच्या चाहत्यांसह संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीला मोठ्या अपेक्षा आहेत.