किंग खानचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होऊन आता २७ दिवस झाले आहेत. तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. नवीन चित्रपट रिलीज झाल्यानंतरही ‘पठाण’लाच चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. २७ व्या दिवशी ‘पठाण’ने कार्तिक आर्यनच्या ‘शेहजादा’पेक्षा चांगली कमाई केली आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘शेहजादा’पेक्षा ‘पठाण’ कमाईच्या बाबतीत वरचढ ठरला आहे. चित्रपट लवकरच जगभरात १००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याच्या तयारीत आहे.

‘शेहजादा’ची कमाई किती?

बॉक्स ऑफिसवर चौथ्या दिवशी ‘शेहजादा’ने २ कोटी रुपयांची कमाई केल्याचा अंदाज आहे. रविवार, १९ फेब्रुवारी रोजी कमाईच्या निम्मी कमाई चित्रपटाने २० फेब्रुवारीला केली. चित्रपटाकडे प्रेक्षक पाठ फिरवत आहेत. अशातच ‘शेहजादा’चे भारतातील एकूण कलेक्शन आता २२ ते २३ कोटी रुपयांच्या घरात आहे.

Video: “हे असले चाळे…” ‘त्या’ व्हिडीओमुळे ‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात ट्रोल

‘पठाण’ची कमाई किती?

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पठाण’ने चित्रपटगृहात २७ दिवस पूर्ण केले आणि अजूनही त्याची बॉक्स ऑफिसवरील जोरदार कमाई चालू आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार पठाणने २० फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिसवर १.५० कोटी ते ३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रविवार १९ फेब्रुवारीच्या आकड्यांशी तुलना करता हा आकडा कमी आहे.

‘पठाण’मध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण व जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर, ‘शेहजादा’मध्ये कार्तिक आर्यन, क्रिती सेनॉन प्रमुख भूमिकेत आहेत.