शाहरुख खान आणि गौरी यांची खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. या दोघांची पहिली भेट १९८४ मध्ये झाली होती. यानंतर अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २५ ऑक्टोबर १९९१ मध्ये बॉलीवूडच्या या लोकप्रिय जोडप्याने लग्नगाठ बांधली. सिनेसृष्टीतील आजवरच्या प्रवासात किंग खानला त्याच्या बायकोने खंबीरपणे साथ दिली. त्यामुळे अनेक मुलाखतींमध्ये शाहरुख त्याच्या यशाचं संपूर्ण श्रेय बायकोला देतो. एका जुन्या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने कलाविश्व व वैयक्तिक आयुष्याबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं होतं.

१९९१ मध्ये म्हणजेच बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यापूर्वी शाहरुख खानने एका लोकप्रिय मासिकाला मुलाखत देताना सांगितलं होतं की, “माझं वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे वेगळं आहे. मला मित्र आहेत, गर्लफ्रेंड, काका, काकी, बहीण अगदी सगळे आहेत आणि हे लोक माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहेत.”

शाहरुख पुढे म्हणाला होता, “काही कलाकार इंडस्ट्रीमध्ये पैसा मिळवण्यासाठी येतात, काही प्रसिद्धी, तर काही वैभव मिळवतात. पण, मला सिनेविश्वात चांगलं काम करून माझ्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा प्रत्येक गोष्टीचा समतोल साधायचा आहे. मला इतरांप्रमाणे या कलाविश्वाच्या जगात हरवून जायचं नाहीये. याउलट मला वास्तववादी जगाच्या संपर्कात राहायचं आहे.”

हेही वाचा : “खोटी आणि अर्थहीन…”, साखरपुड्याच्या व्हायरल बातमीवर बबिता आणि टप्पूने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

“करिअरसाठी आम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही ही संकल्पनाच मला पटत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे, पत्नी किंवा गर्लफ्रेंडकडे दुर्लक्ष का करता त्यांना सोडून कसं देऊ शकता? आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्ही महत्त्वाच्या व्यक्तींकडे दुर्लक्ष केलं, तर याचा तुम्हाला अभिमान कसा वाटू शकतो? तुम्हाला तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना दुखावण्याचा अधिकार अजिबात नाही. मी कुठेतरी वाचलं माझ्यामते ‘स्टारडस्ट’मध्ये वाचलं असावं की, एका व्यक्तीने करिअरसाठी त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलेची साथ सोडली. त्या संबंधित स्त्रीपेक्षा मला माझं करिअर जास्त महत्त्वाचं होतं अशा काहीतरी गोष्टी त्यात लिहिल्या होत्या…म्हणजे तुम्ही एवढे मूर्ख कसे असू शकता? असं वक्तव्य करणं किती हास्यास्पद आहे?” असा सवाल शाहरुखने उपस्थित केला होता.

हेही वाचा : Video : “राजा फोटो माझा काढ…”, मराठी गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, दिलखेचक अदांनी चाहते घायाळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २०१८ मध्ये व्होग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत “शाहरुख माझ्या आयुष्यात आला हे मी माझं भाग्य समजते. तो उत्तम पती आणि सर्वात चांगला बाबा आहे. तुम्ही त्याला एक परिपूर्ण ‘फॅमिली मॅन’ असं नक्कीच म्हणू शकता.” असं त्याची पत्नी गौरी खानने सांगितलं होतं.